कारनं अचानक घेतला पेट आणि...पाहा मुंबईतील बर्निंग कारचा थरारक VIDEO

कारनं अचानक घेतला पेट आणि...पाहा मुंबईतील बर्निंग कारचा थरारक VIDEO

आठवड्याभरापूर्वी नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर असाच बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला होता.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : अंधेरी परिसरात रात्री उशिरा एका कारनं अचानक पेट घेतला. भररस्त्यात कारमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाला. हा बर्निंग कारचा थरार पाहून रस्त्यावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. दरम्यान या दुर्घटनेदरम्यान कार चालक थोडक्यात बचावल्याची माहिती मिळाली आहे. कारनं पेट घेताक्षणी कार चालकाला आपला जीव वाचवण्यात यश आलं आहे.

आगीची माहिती तातडीनं अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी होती. आगीत कार जळून खाक झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा अंधेरीतल्या रस्त्यावर बर्निंग कारचा हा थरार पाहायला मिळाला. ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

हे वाचा-थेट JCB ला म्हणाला, 'मला पाठ खाजवून दे'; Viral Video पाहून हातच जोडाल

आठवड्याभरापूर्वी नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर असाच बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. या कारमध्ये नेत्याचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईत शनिवारी रात्री उशिरा बर्निंग कारचा पुन्हा थरार पाहायला मिळाला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या आगीत गाडी जळून खाक झाली आहे.

First published: October 18, 2020, 7:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading