लखनऊ : पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आज होणार आहे. त्याआधी लखनऊमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. लखनऊच्या हॉटेलमध्ये मोठा अग्नितांडव पाहायला मिळाला. हॉटेलमध्ये आगीचा भडका उडाला यामुळे तिथे गोंधळाचं वातावरण होतं. लोक आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. उत्तर प्रदेशातील लखनऊमधील हजरतगंज इथल्या हॉटेलमध्ये भीषण आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर आतमध्ये अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करणं सुरू आहे. हेही वाचा- 3 सेकंदात 50 फुटावरुन खाली कोसळलं स्काय स्विंग; लोक जमिनीवर आदळून उडाले, धक्कादायक VIDEO
#WATCH | Uttar Pradesh: Fire breaks out at a hotel in Hazratganj in Lucknow. Efforts underway to evacuate the people in the hotel rooms. Details awaited. pic.twitter.com/gxKy6oYyOO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 5, 2022
Fire at Levana Hotel in Lucknow
— Saurabh Sharma (@saurabhsherry) September 5, 2022
Fire department has been pressed to rescue people who are stuck inside the hotel. The cause of fire is yet to be ascertained pic.twitter.com/fZ80Juoy4I
A major fire broke out at a hotel in #UttarPradesh’s #Lucknow city on #Mondaymorning.
— Manjul Farman Abbas Naqvi (@FarmanManjul) September 5, 2022
The #fire department team soon rushed to the site and brought the blaze under control. pic.twitter.com/1wmG0MVI7U
हेही वाचा- 9 मिनिटांत 20 KM अंतर केलं पार; सीटबेल्टही नाही, ‘ही’ ठरली सायरस मिस्त्रींच्या अपघाताची कारणं? ही आग कशामुळे लागली याची कोणतीही माहिती अजून समोर आली नाही. लोक जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उतरत आहेत. अग्निशमन दलाचे जवान या लोकांना रेस्क्यू करत आहेत. हॉटेलमध्ये अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.