अकोला, 11 जानेवारी: अकोला (Akola) जिल्ह्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यक्तीने सामाजिक कार्य (Social work) करण्याच्या नावाखाली एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार (rape on married woman) केला आहे. मागील दहा महिन्यांपासून नराधम आरोपीनं पीडित महिलेला ब्लॅकमेल (Blackmail) करत तिचं लैंगिक शोषण केलं आहे. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं खदान पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह ब्लॅकमेल आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. नराधम आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. राहुल श्रावण मस्के असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो न्यू खेतान नगर परिसरातील रहिवासी आहे. या प्रकरणी 39 वर्षीय पीडित विवाहित महिलेनं पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल मस्के यानं विविध सामाजिक विषयांवर चर्चा करायची असल्याचं सांगून मार्च 2021 मध्ये पीडित महिलेला आपल्या घरी बोलावलं होतं. पीडित महिला घरी आल्यानंतर आरोपीनं जबरदस्ती करत पीडित महिलेवर अत्याचार केला. हेही वाचा- प्रेयसीला भेटायला आला अन् रक्ताच्या थारोळ्यात पडला, GFच्या मुलाने केले सपासप वार हा प्रकार इथेच थांबला नाही, त्याने संबंधित घटनेची माहिती पतीला सांगेल, अशी धमकी देत ब्लॅकमेल केलं. यानंतर आरोपीनं पीडित महिलेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला आहे. तसेच लैंगिक संबंधाची वाच्यता पीडितेच्या पतीकडे करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. तसेच तिला अनेकदा मारहाण देखील केली आहे. हेही वाचा- भल्या पहाटे घरातून गायब झाली विवाहित तरुणी अन्; शेतातील विहिरीत आढळली मृतावस्थेत आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेनं खदान पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह ब्लॅकमेल आणि मारहाण केल्याच्या गुन्ह्यानंतर एफआयआर दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी म्हस्के फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून या घटनेचा पुढील तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.