• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • चालत्या स्कूटरवर धमाका! फटाक्यांच्या भीषण स्फोटात बापलेकाचा मृत्यू, पाहा VIDEO

चालत्या स्कूटरवर धमाका! फटाक्यांच्या भीषण स्फोटात बापलेकाचा मृत्यू, पाहा VIDEO

दिवाळीसाठी गावी चाललेल्या (Father and son died to blast of fire cracker) बाप आणि लेकाचा फटाक्यांच्या स्फोटात मृत्यू झाल्यामुळे दिवाळीच्या दिवशीच शोककळा पसरली.

 • Share this:
  पुदुच्चेरी, 5 नोव्हेंबर: दिवाळीसाठी गावी चाललेल्या (Father and son died to blast of fire cracker) बाप आणि लेकाचा फटाक्यांच्या स्फोटात मृत्यू झाल्यामुळे दिवाळीच्या दिवशीच शोककळा पसरली. आपल्या स्कूटरवरून हे बापलेक फटाक्यांच्या दोन (Father and son carrying two bags of crackers) पिशव्या घेऊन चालले होते. यावेळी झालेल्या जोरदार स्फोटात दोघांनाही आपले प्राण गमावावे लागले. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्फोटाची ही घटना कैद झाली आहे. दिवाळीसाठी घेतले होते फटाके पुदुच्चेरीतील विल्लुपुरम सीमा भागात राहणारे कलैनेसन आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा प्रदीप गुरुवारी कूनिमेदू गावी चालले होते. चालताना त्यांनी देशी फटाक्यांनी भरलेल्या दोन पिशव्या सोबत घेतल्या होत्या. आपल्या स्कूटवर दोन पिशव्या अडकवून ते दिवाळी साजरी करण्यासाठी चालले होते. मात्र रस्त्याने जात असताना अचानक फटाक्यांच्या पिशवीचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटात पिता आणि पुत्र जळून खाक झाले. जागीच या दोघांचा मृत्यू झाला. भीषण स्फोट सीसीटीव्ही फुटेजवरून हा स्फोट किती भयंकर होता, याची कल्पना येऊ शकते. या स्फोटात पितापुत्रासह इतर तिघेही जखमी झाले. सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर पिता कलैनेसन आणि मुलगा प्रदीप यांना मृत घोषित करण्यात आलं. स्कूटरवरून चाललेल्या दोघीनी स्कूटरच्याच बाजूला हा बॅग अडकवल्या होत्या. त्यामुळे शरीराच्या अगदी जवळ भयंकर स्फोट झाल्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला नाही. हे वाचा- New IPO : पुढच्या आठवड्यात Paytm सह तीन IPO येणार, 21000 कोटी उभारण्याची योजना फटाक्यांपासून सावधान पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. अशा प्रकारे फटाक्यांचा स्फोट कशामुळे झाला, याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे पुदुच्चेरीत घबराटीचं वातावरण पसरलं असून ते फटाके दुय्यम दर्जाचे आणि बनावट होते का, याचाही पोलीस शोध घेत आहे. फटाके हे काही उन्हामुळे फुटत नाहीत. तरीदेखील या फटाक्यांचा एवढा मोठा स्फोट कसा झाला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आङे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
  Published by:desk news
  First published: