• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • New IPO : पुढच्या आठवड्यात Paytm सह तीन IPO येणार, 21000 कोटी उभारण्याची योजना

New IPO : पुढच्या आठवड्यात Paytm सह तीन IPO येणार, 21000 कोटी उभारण्याची योजना

पुढील आठवड्यात Paytm ची मूळ कंपनी One97 Communications, Sapphire Foods India Limited आणि Latent View Analytics कंपन्यांचे IPO येणार आहेत. Paytm, Sapphire Foods आणि Latent View Analytics चे IPO अनुक्रमे 8 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर रोजी उघडतील.

  • Share this:
    मुंबई : देशातील आयपीओ मार्केटमध्ये सध्या मोठी हालचाल आहे. एकामागून एक, अनेक कंपन्या त्यांचे Initial Public Offering म्हणजेच IPO आणत आहेत. त्याचबरोबर पुढील आठवड्यात तीन कंपन्यांचे IPO येत आहेत. यातून 21,000 कोटींहून अधिक रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे. पुढील आठवड्यात Paytm ची मूळ कंपनी One97 Communications, KFC आणि पिझ्झा हट रेस्टॉरंट्स चालवणारे Sapphire Foods India Limited आणि डेटा अॅनालिटिक्स सर्विसेस फर्म लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्स (Latent View Analytics) त्याचा IPO आणत आहे. Paytm, Sapphire Foods आणि Latent View Analytics चे IPO अनुक्रमे 8 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर रोजी उघडतील. गेल्या आठवड्यात 5 कंपन्यांचे IPO ओपन दिवाळीच्या आठवड्यातही विविध क्षेत्रातील पाच कंपन्यांचे आयपीओ यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. यात Nykaa ऑपरेटिंग FSN E-Commerce Ventures Limited, PolicyBazaar ची मूळ कंपनी PB Fintech, Fino Payments, SJS Enterprises आणि Sigachi Industries यांचा समावेश आहे. कॅलेंडर वर्षात IPO च्या माध्यमातून 1 लाख कोटींची उभारणीची योजना या कॅलेंडर वर्षात आयपीओच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपये जमा होण्याची शक्यता असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. 2021 मध्ये आतापर्यंत 46 कंपन्यांनी IPO द्वारे 80,102 कोटी रुपये उभारण्यात यश मिळवले आहे. गेल्या वर्षी 15 कंपन्यांचे आयपीओ आले या व्यतिरिक्त POWERGRID कॉर्पोरेशनच्या पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट POWERGRID InvIT ने देखील IPO द्वारे 7,735 कोटी रुपये उभे केले. ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टनेही शेअर्सच्या विक्रीतून 3,800 कोटी रुपये उभे केले. 2020 च्या तुलनेत IPO मार्केटची कामगिरी चांगली आहे. गेल्या वर्षभरात 15 कंपन्यांचे आयपीओ आले होते, त्यामुळे केवळ 26,611 कोटी रुपये उभारता आले होते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published: