मराठी बातम्या /बातम्या /देश /FASTagमुळे घडला मोठा बदल, तब्बल 20 हजार कोटी रुपयांची बचत; गडकरींचा दावा

FASTagमुळे घडला मोठा बदल, तब्बल 20 हजार कोटी रुपयांची बचत; गडकरींचा दावा

FASTag मुळे टोलटॅक्स बूथवर वाहन थांबण्याचा कालावधी कमी झाला आहे. यामुळेही इंधनाची मोठी बचत झाली आहे, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटलं आहे.

FASTag मुळे टोलटॅक्स बूथवर वाहन थांबण्याचा कालावधी कमी झाला आहे. यामुळेही इंधनाची मोठी बचत झाली आहे, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटलं आहे.

FASTag मुळे टोलटॅक्स बूथवर वाहन थांबण्याचा कालावधी कमी झाला आहे. यामुळेही इंधनाची मोठी बचत झाली आहे, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली, 1 मार्च : 'FASTagची सुविधा सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये जवळपास 20 हजार कोटी रुपयाचं इंधन वाचलं आहे,' असा दावा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. FASTag मुळे टोलटॅक्स बूथवर वाहन थांबण्याचा कालावधी कमी झाला आहे. यामुळेही इंधनाची मोठी बचत झाली आहे, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari Reaction On FASTag) यांनी म्हटलं आहे.

देशातील महामार्गांचे रेटिंग करण्याचे काम मंत्रालयाच्या माध्यमातून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार महामार्गाच्या रेटिंगचे काम जात आहे. सोबतच देशातील रस्त्यावरील अपघात कमी करण्याचे मंत्रालयाचे टार्गेट आहे. आतापर्यंत केंद्रीय परिवहन मंडळाच्या वतीने 11 हजार 35 किमी राष्ट्रीय महामार्गांचे निर्माण करण्यात आलेले आहे. जवळपास 33 किमी दर दिवशी महामार्ग बनविला जात आहे. सोबतच 18 तासात 25 किमी मार्ग सोलापूर-विजापूर बनवला आहे. हा लिम्का बुक रेकॉर्ड झाला, तर मुंबई दिल्ली महामार्गावरील एका ठिकाणी चार लेनचा रोड 24 तासात बनविला आहे. हा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी दिली आहे.

हेही वाचा - दिल्लीतून पृथ्वीराज चव्हाण यांना ताकद, भाजपविरुद्ध लढण्यासाठी दिली मोठी जबाबदारी

नितीन गडकरी यांचा काय आहे नवा संकल्प?

'परिवहन मंडळाच्या वतीने यावर्षी 40 किमी बनविण्याचे लक्ष्य आहे. यापूर्वी याप्रकारचे काम झाले असे मला वाटत नाही. सर्व व्यवहार पारदर्शक करण्याचे काम मंत्रालय करत आहे. जेव्हा पासून FASTag सुरू झाले तेव्हापासून 20 हजार कोटी रुपयांचे इंधन वाचले आहे. सोबतच लाईव्ह मॉनीटेरिंग सुरू झाले आहे. 8 राज्यांना हे दालन उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

40 बाबींचा आधारावर रोड ऑडिट करण्यात येणार आहे. यामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. सोबतच FASTag अजून अत्याधुनिक करण्याची मंत्रालयाची योजना आहे. आगामी काळात सॅटेलाइटद्वारे टोल टॅक्स बूथ चालविण्याची सरकारची योजना असून या पैशांचा उपयोग देशातील रस्त्यांची रस्त्यांचे जाळे त्यासाठी करण्यात येणार आहे,' असा संकल्प केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Fastag, Nitin gadkari