Farmers Protest: शेतकरी मागण्यांवर ठाम, PM मोदींना लिहिलं स्वत:च्या रक्ताने पत्र

Farmers Protest: शेतकरी मागण्यांवर ठाम, PM मोदींना लिहिलं स्वत:च्या रक्ताने पत्र

काही आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी रक्ताने पत्र लिहून 'जे शेतकरी गांधीवादी पद्धतीनं आंदोलन करत आहेत. त्या शेतकऱ्यांना भगतसिंगांसारखं रक्तही देता येतं.' हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Share this:

जींद, 27 फेब्रुवारी: गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन (Farmer Protest) सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकरी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. काही आंदोलक शेतकर्‍यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आपल्या रक्ताने (Wrote letter with blood) पत्र लिहून संबंधित कायदे मागे घेण्याची आणि एमएसपी (MSP) लागू करण्याची मागणी केली आहे.

जींद येथील टोल नाक्याजवळ केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍या शेकडो शेतकर्‍यांनी इंजेक्शनद्वारे रक्त काढून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. यावेळी शेतकऱ्यांनी 'हे काळे कायदे आम्हाला नको आहेत, त्याऐवजी सरकारने एमएसपीवर कायमस्वरूपी कायदे केले पाहिजेत', अशी मागणी त्यांनी केली आहे.

हरियाणातील जींद जिल्ह्यातील आंदोलक शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना रक्ताने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आम्हाला हे तीनही काळे कायदे नको आहेत. हे तीन काळे कायदे परत घ्या आणि एमएसपीवर कायमस्वरुपी कायदा करा. जींद टोल प्लाझा येथे आंदोलन करणाऱ्यांनी शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की, गेल्या 63 दिवसांहून अधिक काळ आम्ही कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. असं असलं तरी अद्याप कोणतीही सुनावणी झालेली नाही. त्यामुळेच तरुण शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने पंतप्रधानांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा-खेळणी उद्योगात दडलेली ताकद ओळखून ती वाढवणं आवश्यक : पंतप्रधान मोदी

रक्ताने पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, जे शेतकरी गांधीवादी पद्धतीनं आंदोलन करत आहेत. त्या शेतकऱ्यांना भगतसिंगांसारखं रक्तही देता येतं. महिला शेतकरी सिक्कम, शेतकरी नेते विजेंदर सिंधू आदी म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशासह देशातील अनेक राज्यातील शेतकरी केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. हे कायदे कोणत्याही परिस्थितीत मागे घ्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Published by: News18 Desk
First published: February 27, 2021, 2:47 PM IST

ताज्या बातम्या