Kisan Tractor Rally: संतप्त आंदोलकांपासून दिल्ली पोलिसाला शेतकऱ्यानेच वाचवले, पाहा VIDEO
Farmers Protest: असा व्हिडीओ समोर येत आहे, ज्यामध्ये दिसून येईल की हा वाद पोलिसांशी नसून कृषी कायद्याविरोधात आहे. एका दिल्ली पोलिसाला एका शेतकऱ्यानेच संतप्त शेतकऱ्यांच्या गराड्यातून वाचवले आहे.
नवी दिल्ली, 26 जानेवारी: कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे (Kisan Tractor Rally) आयोजन करण्यात आले होते. परंतु, या रॅलीला आता हिंसक वळण मिळत आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ठिकठिकाणी अडवल्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट होत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान एक असा व्हिडीओ समोर येत आहे, ज्यामध्ये दिसून येईल की हा वाद पोलिसांशी नसून कृषी कायद्याविरोधात आहे. एका दिल्ली पोलिसाला एका शेतकऱ्यानेच संतप्त शेतकऱ्यांच्या गराड्यातून वाचवले आहे. या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांची या पोलिसाशी बाचाबाची होत असताना एका आंदोलनकर्त्या शेतकऱ्यानेच त्यांना वाचवले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH: A Delhi Police personnel rescued by protesters as one section of protesters attempted to assault him at ITO in central Delhi. #FarmLawspic.twitter.com/uigSLyVAGy
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. या ट्रॅक्टर रॅलीदरम्यानचाच हा व्हिडीओ आहे. मध्य दिल्लीतील आयटीओ जवळचा हा व्हिडीओ असून, एका आंदोलनकर्त्या शेतकऱ्याने त्यांंची त्याठिकाणाहून सूटका केली आहे.
दरम्यान टिकरी बॉर्डरपासून निघालेल्या शेतकऱ्यांची विराट ट्रॅक्टर रॅली अखेर दिल्लीच्या तख्ताजवळ पोहोचली आहे. दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोड बंदोबस्त लावून सुद्धा शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन लालकिल्ल्यावर धडकले आहे. लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. नांगलोई, नजफगड, बहादुरगड येथून परत मागे जात शेतकऱ्यांची रॅली टिकरी बार्डरवर पोहोचली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी नांगलोई इथं बॅरिकेटस तोडून टाकले आहे. पोलिसांनीही शेतकऱ्यांच्या रॅलीवर अश्रू धुरांचा मारा केला आहे. त्यामुळे संतापलेल्या जमावाने पोलिसांवर चाल केली आहे. त्यामुळे हे आंदोलन आता हिंसक वळणावर येऊन पोहोचले आहे.