गुरुग्राम, 16 फेब्रुवारी: एक वाईट बातमी (Bad News) समोर येत आहे. शताब्दी एक्स्प्रेसच्या (Shatabdi Express) धडकेत 4 तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सायबर सिटी गुरुग्रामध्ये ट्रेनची धडक बसल्यानं चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चारही तरुण अॅक्टिव्हानं बसई धनकोट भागाला लागून असलेल्या रेल्वे लाईनवर पोहोचले आणि ट्रेन जवळ येताच सेल्फी (Selfie) घेण्यात व्यस्त होते, असं सांगितलं जात आहे. जीआरपी अधिकारी रामफल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे चारही तरुणांना ट्रेनची धडक बसली आणि त्यांचा मृत्यू (Death) झाला.
घटनास्थळी पोहोचलेले जीआरपी पोलीस अधिकारी रामफल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराय रोहिल्लाहून अजमेरला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी 4.48 वाजता गुरुग्राम रेल्वे स्थानकातून निघाली. संध्याकाळी 5.15 च्या सुमारास जीआरपीला चार तरुणांना रेल्वेची धडक बसून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. सध्या जीआरपीने चारही तरुणांचे मृतदेह आणि मोबाईल फोन ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Taliban राजवटीला 6 महिने पूर्ण, Afghani नागरिकांचा असा सुरुय संघर्ष
जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चार तरुण हातात पिस्तुलसारखं लायटर घेऊन रेल्वे रुळावर आले होते. यादरम्यान तेथील सर्वजण पिस्तुलासारख्या लायटरसह व्हिडिओ आणि सेल्फी घेत होते. त्यानंतर हे चारही तरुणांना मागून येणाऱ्या रेल्वेची धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, तरुणांच्या मृतदेहाचे भाग 500 मीटरपर्यंत विखुरलेले दिसले. अॅक्टिव्हाच्या क्रमांकावरून चार तरुणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
मध्य प्रदेशातील बैतूलमध्येही रेल्वे पुलावर सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या दोघांना आपला जीव गमावावा लागला होता. एक तरुण फोटोग्राफर होता तर दुसरा शेतकरी होता. शहापूर येथील रेल्वे पुलाजवळ दोघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Selfie, Shocking accident, Shocking news, Train accident