जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कोरोनाच्या संकटात कशी पार पडणार आषाढी वारी? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

कोरोनाच्या संकटात कशी पार पडणार आषाढी वारी? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

कोरोनाच्या संकटात कशी पार पडणार आषाढी वारी? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

यंदाच्या आषाढीवारी पालखी सोहळ्यावर कोरोनाच सावट राहील हे स्पस्ट आहे. त्या पद्धतीनं आतापासूनच तयारी करावी लागेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 04 मे : राज्यामध्ये कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. या रोगाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची वेळ आली. संचारबंदीमुळे सर्व सण, उत्सवांवर पाणी फिरलं. या महिन्यांमध्ये उभ्या महाराष्ट्राला ओढ असते ती आषाढी वारीची. पण यंदाच्या आषाढी वारीच्या पालखीवर कोरोनाचं सावट आहे. आषाढी वारी सोहळा संयमित करण्यासाठी वारकरी सकारात्मक आहेत. मात्र, पालखी सोहळा तोंडावर आलेला असतांना देखील प्रशासनाकडून स्पस्ट सूचना मिळत नसल्यानं पालखी सोहळा प्रमुखांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या आषाढीवारी पालखी सोहळ्यावर कोरोनाच सावट राहील हे स्पस्ट आहे. त्या पद्धतीनं आतापासूनच तयारी करावी लागेल. मात्र, पंढपूरला नेमका सोहळा न्यायचा कसा? याबाबत शासनानं प्रमुख सोहळा प्रमुख आणि दिंडी मालकांची बैठक आयोजित करावी अशी मागणी प्रमुख चोपदार रामभाऊ यांनी केली आहे. महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीची मोठी परंपरा आहे. या वारीमध्ये लाखो भाविक पायी पंढरपूरला जातात. पण यंदा ते शक्य नाहीये. त्यामुळे नेमकी पालखी कशी जाणार यावर अद्याप संभ्रम आहे. नागरिकांना रस्त्यावर पाहून मुख्यमंत्री भडकले; 30 मेपर्यंत दिला हा अल्टिमेटम खरंतर 12 जूनला संत तुकाराम महाराजांची तर 13 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. मुक्ताईचा पालखी सोहळादेखील याच महिन्यात असतो. दोन्ही सोहळे पुणे जिल्ह्यातून निघणार असल्यानं राज्याचं उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री अजित पवार यासंदर्भात काय निर्णय घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दारूला मिळाली आता यासाठी परवानगी हवी : धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र संकलन आणि संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात