इंदौर, 19 मार्च: नोकरीचं आमिष (Pretext of Job) दाखवून एका महिलेवर बलात्कार (Rape) करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा फेसबुकमुळे तपास (Accused found because of Facebook) लागला आहे. आरोपी व्यक्तीनं 17 वर्षांपूर्वी एका 22 वर्षीय युवतीला नोकरीचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (17 Year old rape case) केला होता. त्यानंतर पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचं नाव माहित नसल्याने तक्रार कोणाविरुद्ध दाखल करायची, असा प्रश्न पोलिसांनी विचारला होता. त्यामुळे संबंधित बलात्कार प्रकरण तसंच दाबलं गेलं होतं. पण अलीकडेच एका फेसबुक (Facebook) पोस्टमुळे आरोपीचा सुगावा लागला आहे. आता याप्रकरणी नीमच याठिकाणी राहणाऱ्या पीडित महिलेनं रतलाम येथील रहिवासी असणाऱ्या सुनिल नावाच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2004 साली एका युवकाने संबंधित युवतीला नोकरी देण्याचं आमिष दाखवून इंदौर याठिकाणी बोलावलं होत. यानंतर आरोपीनं एका ऑफिसमध्ये तिच्यावर बलात्कार केला आणि तेथून पळ काढला होता. या घटनेमुळे पीडित महिलेवर मानसिक आघात झाला होता. त्यानंतर ती बराच काळ नैराश्यात गेली होती. तिच्या आय़ुष्याची गाडी आता कुठे रुळावर येत असताना तिला फेसबुकवर आरोपीचा फोटो दिसला. त्यानंतर तिने इंदौर याठिकाणी जावून 17 वर्षांपूर्वी बलात्कार करणाऱ्या आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेची कहाणी ऐकून पोलीसांनाही धक्का बसला आहे.
पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, नीमच या मुळ गावची असणारी 39 वर्षीय पीडित महिला 2004 साली 22 वर्षांची होती. त्यावेळी ती रतलाम जिल्ह्यात राहत होती. एकेदिवसी पीडितेच्या घरात लँड लाइनवर एक फोन आला, ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीनं सांगितलं की, 'आपण नोकरी देण्याचं काम करतो. यावेळी पीडित युवतीलाही नोकरीची गरज होती. त्यामुळे ती आरोपीच्या आमिषाला बळी पडली. त्यानंतर आरोपीनं सांगितलं की, इंदौर येथील एका ऑफिसमध्ये नोकरीची चांगली संधी आहे. पगारही चांगला देतील. यावर पीडित युवती नोकरी मिळवण्यासाठी इंदौर याठिकाणी आरोपीच्या ऑफिसमध्ये गेली. त्यावेळी आरोपीनं संधी साधून पीडितेवर बलात्कार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
हे ही वाचा-लग्नानंतर काही दिवसांमध्ये मामीचं भाच्याशी जमलं, दोघांनी घेतला 'हा' निर्णय
त्यानंतर पीडित युवतीनं बाहेरील एका व्यक्तीची मदत घेवून आपल्या भावाला संपर्क केला आणि आपल्या गावी निघून गेली. त्यानंतर काही दिवसाने तिने नीमच पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचं नाव माहित नसल्यामुळं काहीही उपयोग झाला नाही. पण अलीकडेच ती फेसबुक पाहत असताना तिला आरोपीचा फोटो दिसला. त्यानंतर तिने खात्री केली, आणि इंदौर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, सोशल मीडिया अकाऊंटच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.