जाहिरात
मराठी बातम्या / देश / फेसबुकवरील मित्रानं केला घात, आधी बलात्कार केला मग पीडितेच्या वडिलांकडे मागितले 10 लाख

फेसबुकवरील मित्रानं केला घात, आधी बलात्कार केला मग पीडितेच्या वडिलांकडे मागितले 10 लाख

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime News: सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून (Social media friendship) एका तरुणाने युवतीला हॉटेलवर बोलावून तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 04 डिसेंबर: सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून (Social media friendship) एका तरुणाने युवतीला हॉटेलवर बोलावून तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणानं पीडित तरुणीला जेवणातून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचाराचा कळस गाठला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने पीडित मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ शूट (Shoot obscene video) केला आहे. तसेच संबंधित व्हिडीओ पीडित तरुणीच्या वडिलांना पाठवून दहा लाखांची खंडणी देखील मागितली (Demand 10 lakh) आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह ब्लॅकमेल आणि खंडणीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. सनी गुप्ता असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो आग्रा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही उत्तर प्रदेशातील तालकटोरात येथील रहिवासी असून 2019 साली फेसबुकवरून तिची ओळख सनी गुप्ता नावाच्या तरुणाशी झाली होती. हेही वाचा- ..अन् चिमुकल्या बहीण-भावाचं हरपलं विश्व; शेतकरी दाम्पत्याने केला हृदयद्रावक शेवट सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर, आरोपी सनी तिच्याशी सतत बोलायचा. तसेच काही वेळा तो लखनऊ येथे पीडित तरुणीला भेटायला देखील आला होता. यावेळी त्याने पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून पीडितेला एका हॉटेलात बोलावलं. याठिकाणी आरोपीनं पीडितेला गुंगीचं औषध देत तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेवर अनेकदा अत्याचार केला आहे. हेही वाचा- Beed: पत्नीचे शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध; कंटाळलेल्या पतीनं उचललं भयावह पाऊल आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं त्याला भेटण्यास नकार दिला. यामुळे आरोपीनं संबंधित अश्लील व्हिडीओ पीडित तरुणीच्या वडिलांना पाठवला. तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, पीडितेच्या वडिलांकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीनं पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी सनी गुप्ता याला आलमबाग येथून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात