मराठी बातम्या /बातम्या /देश /'माझे वडील काही झूमधले प्राणी नाहीत',माजी PM मनमोहन सिंग यांची मुलगी आरोग्य मंत्र्यावर संतापली

'माझे वडील काही झूमधले प्राणी नाहीत',माजी PM मनमोहन सिंग यांची मुलगी आरोग्य मंत्र्यावर संतापली

मनमोहन सिंग यांच्या मुलीने संताप व्यक्त केला आहे.

मनमोहन सिंग यांच्या मुलीने संताप व्यक्त केला आहे.

मनमोहन सिंग यांच्या मुलीने संताप व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former Prime Minister Manmohan Singh) यांच्या प्रकृती पाहण्यासाठी एम्समध्ये पोहोचलेले केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडावा यांच्यावर टीका केली जात आहे. आरोग्य मंत्री मंडाविया आपल्या फोटोग्राफरसह रुग्णालयात दाखल असलेल्या माजी पंतप्रधानांना पाहायला गेले. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधानांसोबत काही फोटो घेतले.

यावर मनमोहन सिंग यांच्या मुलीने सांगितलं की, माझ्या आईने अनेकदा फोटोग्राफरला खोलीच्या बाहेर जाण्यासाठी सांगितलं होतं. मात्र त्यांनी ऐकलं नाही. माझी आई डॉ. सिंग याचे फोटो घेतल्यामुळे खूप नाराज होती. आमचं कुटुंब सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे. ते वयस्कर आहे, ते कोणा प्राणीसंग्रहालयातील प्राणी नाहीत. ( Ex PM Manmohan Singhs daughter angry at health minister)

काँग्रेस पार्टीने मांडवियावर केली टीका

काँग्रेस पार्टीनेदेखील मंत्री मनसुख मांडविलावर टीका केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वैयक्तिक हक्काचा उल्लंघन केल्यामुळे माफी मागण्याची मागणी केली आहे.

माजी पंतप्रधानांना पाहण्यासाठी ते एम्सला पोहोचले होते आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सदस्याचा विरोध असताना फोटो काढले. पार्टीने सांगितलं की, मनमोहन यांना भेटण्यासाठी ते सोबत फोटोग्राफरला घेऊन गेले होते. काँग्रेसने मांडावियाच्या या कृत्यावर टीका केली आणि त्याची ही भेट पीआर स्टंट असल्याचंही म्हटलं.

हे ही वाचा-अमित शाहांच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी, आळवले शांततेचे सूर

मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण

डॉ. सिंग यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना डेंग्यूची लागण झाली असून सध्या तो धोक्याच्या बाहेर आहेत. डॉ. सिंग यांच्या प्लेट्सलेट्समध्ये वाढ होत आहे.

First published:

Tags: AIIMS, Health, Manmohan singh