जाहिरात
मराठी बातम्या / देश / Yogi Adityanath Interview LIVE: राम मंदिरात रामलल्ला कधी विराजमान होणार? योगी आदित्यनाथ यांनी सांगितली ताारीख

Yogi Adityanath Interview LIVE: राम मंदिरात रामलल्ला कधी विराजमान होणार? योगी आदित्यनाथ यांनी सांगितली ताारीख

राम मंदिराचे बांधकाम हे ठरल्याप्रमाणे सुरू आहे. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण होणार आहे.

राम मंदिराचे बांधकाम हे ठरल्याप्रमाणे सुरू आहे. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण होणार आहे.

राम मंदिराचे बांधकाम हे ठरल्याप्रमाणे सुरू आहे. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण होणार आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी :  ‘राम मंदिराचे बांधकाम हे ठरल्याप्रमाणे सुरू आहे. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण होणार आहे. वेळेच्याआधीच रामलल्ला हे मंदिरात विराजमान होणार आहे. शेकडो वर्षांनंतर रामलल्ला हे मंदिरात विराजमान होणार आहे. 1 जानेवारीच्या आधी हे कार्य पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे,  राम मंदिर निर्माण समिती आहे, त्यानुसार योग्य निर्णय घेईल, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली. ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये Network18 के एडिटर-इन-चीफ राहुल जोशी हे योगी आदित्यनाथ यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये उत्तर प्रदेशचा विकासाच्या ब्लू प्रिंटबद्दल योगी आदित्यनाथ खुलासा केला आहे.

ग्लोबल समिटीची वेळ जवळ येत आहे. आम्ही आमच्या राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्याकडे पूर्ण मनुष्यबळ आहे, लघू उद्योग आहे. ग्लोबल समिटीमध्ये जीडीपीपेक्षा जास्त गुंतवणूक आणणार आहोत, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. संसद खेळ महाकुंभाचे सिद्धार्थनगरच्या स्टेडियममध्ये 1 फेब्रुवारीला आयोजित केलं होतं. यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, जर देश आणि राज्याचा विकास पुढे न्यायचा असेल तर खेळाला प्रोत्साहन द्यावे लागणार आहे’ उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणार आहे. आमच्याकडे उद्योग, आणि शेती क्षेत्रामध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. पुरसं मनुष्यबळ आहे. ग्लोबल समिटीमध्ये आम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक आणणार आहोत. उत्तर प्रदेशचा विकास दर हा 13 ते 14 टक्के इतक आहे. आता आमची एक टक्के ग्रोथ झाली आहे. औद्योगिक आणि इतर क्षेत्रातही आमचा विकास झाला आहे. देशातील 20 टक्के खाद्य उत्पादन उत्तर प्रदेश करते. केंद्र आणि राज्य स्तारावर जोरदार प्रयत्न सुरू आहे. रोजगार मिळवून देण्यासाठी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात क्षेत्र उपलब्ध आहेत. उत्तर प्रदेशमध्ये इन्फ्रास्टक्चर आहे, NCR शी जोडलेला आहे. पश्चिम आणि दक्षिण भागाला जोडण्यासाठी विमानतळाचे प्रमाण वाढले आहे. देशातील नंबर एकचे वॉटर वेल प्रकल्प आमच्याकडे आहे. एक्सप्रेस हायवेला जोडणारी यंत्रणा उत्तर प्रदेशमध्ये आहे. मागील 6 वर्षांमध्ये आम्ही 5 लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या दिल्या. MSEM आणि विश्वकर्मा श्रम योजनेतून उत्तर प्रदेशात 1 लाख 68 लोकांना जोडलं आहे. पंतप्रधान मुद्रा योजना, मुख्यमंत्री रोजगार योजना आणि इतर माध्यमातून 60 लाख लोकांना व्यापाऱ्यांसोबत जोडू शकलो आहे, त्यामुळे आगामी काळात आमच्याकडे अनेक करार होत आहे. पुढील 2 वर्षांमध्ये हे करार तयार होईल, त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे, असं आश्वासनही योगी आदित्यनाथ यांनी दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात