जाहिरात
मराठी बातम्या / देश / VIDEO : कार्यक्रमादरम्यान अचानक व्यासपीठावरुन खाली कोसळले ऊर्जा मंत्री, तत्काळ रुग्णालयात दाखल

VIDEO : कार्यक्रमादरम्यान अचानक व्यासपीठावरुन खाली कोसळले ऊर्जा मंत्री, तत्काळ रुग्णालयात दाखल

VIDEO : कार्यक्रमादरम्यान अचानक व्यासपीठावरुन खाली कोसळले ऊर्जा मंत्री, तत्काळ रुग्णालयात दाखल

मंत्र्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं आहे, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 1 जुलै : ग्वाल्हेरमध्ये आज झालेल्या एका सरकारी कार्यक्रमादरम्यान मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर अचानक खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ऊर्जा मंत्री जमिनीवर दिसत आहे. कार्यकर्ते त्यांना वारा घालत आहे. ग्वाल्हेरमधील राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या उद्घाटनाच्या या कार्यक्रमात 10 फूट लांब व्यासपीठावर 25 जणं बसलेले होते. (Energy Minister Pradyumna Singh Tomar suddenly collapsed from the stage during the event) मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांना बाह्य जखम नसली तरी अंतर्गत मार लागला आहे. ही घटना घडली तेव्हा केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रदेश सरकारचे मंत्री भारत सिंह कुशवाह आणि खासदार विवेक शेजवलकरदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.

जाहिरात

हे ही वाचा- लसीकरणात काय अडचणी येतात हे पाहण्यासाठी रांगेत उभा राहा; मंत्र्यांना सूचना काही दिवसांपूर्वी प्रद्युम्न सिंह तोमर यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ ग्रामीण भागातील भेटीदरम्यानचा आहे. यामध्ये गावकऱ्यांची विजेची समस्या सोडविण्यासाठी ऊर्जा मंत्री स्वत: विजेच्या खांबावर चढून तेथील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर आज एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात