पुलवामामध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, सकाळी-सकाळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामामध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, सकाळी-सकाळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा

गोरीपारा परिसरात आणखीन तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळत आहे.

  • Share this:

श्रीनगर, 25 एप्रिल : एकीकडे कोरोनाचं संकट जम्मू-काश्मीरसह देशभरात असताना दुसरीकडे घुसखोर आणि दहशतवाद्यांच्या कुरघोड्या थांबण्याचं नाव घेत नाहीत. दहशतवाद्यांकडून वारंवार शस्रसंधीचं उल्लंघन किंवा घुसखोरी सुरू असल्यानं भारतीय सैन्याला काश्मीरमधील वेगवेगळ्या सेक्टरमध्ये दोन भूमिका एकाचवेळी निभावाव्या लागत आहेत. पुलवामा इथे अवंतीपोरा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये शनिवारी सकाळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना मोठं यश आलं आहे. तर गोरीपारा परिसरात आणखीन तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळत आहे. या परिसरात दहशतवाद्यांकडून तुफान गोळीबार सुरू आहे. जवानांनी त्यांना घेरलं असून त्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत. या परिसरात जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सुरक्षा दलाला पुलवामाच्या अवंतीपोरा येथे काही दहशतवादी लपवल्याची माहिती मिळाली होती. भारतीय सैनिकांनी या भागात शोध मोहीम सुरू केली. तिथल्या घरामध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. दहशतवादी लपलेल्या घराला जवानांनी घेरलं असून चकमक अजूनही सुरू आहे. तीन दहशतवादी गोरीपोरा परिसरात लपल्याची माहिती जवानांना मिळाली आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

हे वाचा-कोरोना वॅस्किनची मानवी चाचणी, पहिल्यांदा लस टोचून घेणारी एलिसा काय म्हणाली?

हे वाचा-गृहमंत्रालयानं रात्री उशिरा काढला आदेश, देशभरात आजपासून सुरू होणार ही दुकानं

First published: April 25, 2020, 7:49 AM IST

ताज्या बातम्या