Home /News /national /

एकामागोमाग एक LeT च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक संपली; सर्च ऑपरेशन सुरुच

एकामागोमाग एक LeT च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक संपली; सर्च ऑपरेशन सुरुच

श्रीनगरमध्ये (Srinagar) रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू झालेली (Clashes between security forces and militants) चकमक संपली आहे.

    जम्मू, 10 एप्रिल: श्रीनगरमध्ये (Srinagar) रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू झालेली (Clashes between security forces and militants) चकमक संपली आहे. याआधी एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं होतं, मात्र अवघ्या तासाभरात सुरक्षा दलांनी तेथे लपून बसलेल्या आणखी एका दहशतवाद्याचा (terrorist) खात्मा केला आहे. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. काश्मीर झोन पोलिसांनी आज सकाळी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरू झालेल्या चकमकीचा तपशील इंटरनेट मीडियावर शेअर केला. श्रीनगरमध्ये आज सकाळी सुरू झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याचं काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट केलं आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी बनवली मोदींची आवडती गुजराती डिश,  Photo पोस्ट करत म्हणतात की... ठार झालेला दहशतवादी अलीकडेच CRPF वर हल्ला करण्याच्या कटात सामील होता. चकमकीच्या ठिकाणी अजूनही दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती समोर येतेय. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. श्रीनगरच्या बिशंबर नगरमध्ये ही चकमक सुरू आहे. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, बिशंबर नगरमध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे दोघांमध्ये चकमक झाली आणि दहशतवादी ठार झाला. 4 एप्रिल रोजी सीआरपीएफ जवान शहीद आयजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, ठार झालेला दहशतवादी 4 एप्रिलला श्रीनगरच्या मैसुमा भागात झालेल्या हल्ल्यात सामील होता. ज्यात एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आणि दुसरा जखमी झाला. सीआरपीएफ जवानांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्यांपैकी एक दहशतवादी श्रीनगरमध्ये चकमकीत मारला गेला." असे आयजीपी यांनी ट्विटरवर सांगितले. काही वेळाने काश्मीरच्या आयजींनी पुन्हा माहिती शेअर केली की आता श्रीनगरमध्ये सुरू असलेली चकमक संपली आहे. दोन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे होते. त्यांच्याकडून शस्त्रे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या असून, आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. अनंतनागमध्येही चकमक याआधी शनिवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी ठार झाला होता. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी अनंतनाग जिल्ह्यातील शिरहामा परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. IPL 2022 : CSK ला 'त्या' एका चुकीचा मोठा फटका, रवी शास्त्रींनी सांगितलं नेमकं कारण  यादरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि ऑपरेशनचे चकमकीत रूपांतर झाले. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवाद्याचा खात्मा केला असून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terror acttack, Terrorist

    पुढील बातम्या