जाहिरात
मराठी बातम्या / देश / ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांना मिळणार घरबसल्या पगार, भारतीय वंशाचा तरुण आखतोय नवी योजना

ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांना मिळणार घरबसल्या पगार, भारतीय वंशाचा तरुण आखतोय नवी योजना

ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांना मिळणार घरबसल्या पगार, भारतीय वंशाचा तरुण आखतोय नवी योजना

कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन न काढण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सरकारकडूनही आर्थिक मदत दिली जाणार आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

इंग्लंड, 24 मे : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील विकसित देशांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अमेरिकेपासून ते फ्रान्सपर्यंत लाखो लोकांच्या डोक्यावर लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची टांगती तलवार आहे. याबाबत ब्रिटेनची परिस्थितीही फारशी चांगली नाही. येथे कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 55 हजार हून जास्त झाली आहे. अशात वित्त मंत्री ऋषी सुनक यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, 8 अरबपेक्षा जास्त कामगारांच्या पगारातील 80 टक्के निधी देण्यात येईल. याअंतर्गत बिटेनमधील एम्पलॉयमेंट स्कीमअंतर्गत एक नवा शब्द जोडण्यात आला आहे. तो म्हणजे furlough scheme. यानुसार कंपनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढू शकत नाही. तर त्यांना सरकारकडून पगारातील मोठा निधी मिळेल. मात्र लॉकडाऊन वाढल्यानंतर सरकारकडून दिलेलं वचन पूर्ण केलं जाईल की नाही हे पाहण औत्सुक्याचे ठरेल. कोण आहेत ऋषी सुनक जॉन्सन मंत्रिमंडळातील 39 वर्षीय सुनक भारतीय वंशाचे आहे. ते ब्रिटेनमध्ये वित्त मंत्री म्हणून काम पाहत आहेत. ते 2019 मध्ये रिचमंडमध्ये दुसऱ्यांदा खासदार निवडून आले. तसं मंत्रिमंडळात वित्त मंत्रीपद पहिल्यांदा कोणी भारतीयाला देण्यात आलं आहे. ब्रिटेनमध्ये जन्मलेले ऋषी यांनी करिअरची सुरुवात इन्वेस्टमेंट बँक गोल्डमॅन सैशेपासून (Goldman Sachs Group Inc) केली होती. ऋषी यांची पत्नी इन्फोसिसचे फाऊंडर नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. युकेमध्ये कोरोनाच्या संकटात नवीन स्कीम सुरू केली आहे. याअंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढू शकत नाही. तर त्यांना सरकारकडून 80 टक्के निधी दिला जाणार आहे. यादरन्याम कर्मचाऱ्यांना कार्यालयात जावयाचे नाही. तर घरात बसून पैसे मिळतील. या पैशातून त्यांना सरकारी टॅक्सही भरावे लागणार आहे. या स्कीमबाबत वित्तमंत्री ऋषी यांनी घोषणा केली आहे. ही स्कील ऑक्टोबरपर्यंत सुरू राहू शकते. हे वाचा - लॉकडाऊनमध्ये उडवला लग्नाचा बार; घरी जाण्याऐवजी थेट पोहोचले रुग्णालयात आठवडाभरात महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात