जाहिरात
मराठी बातम्या / देश / संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार, 57 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार, 57 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार, 57 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी नवी दिल्ली, 12 मे : राज्यातील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. त्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुकीचा (Rajya Sabha Election 2022) कार्यक्रम जाहीर केला आहे. देशातील एकूण 15 राज्यांच्या 57 जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या (Maharashtra) सहा जागांचा समावेश आहे. ही निवडणूक 10 जूनला होणार आहे. या निवडणुकीसाठी 31 मे पर्यंत अर्ज सादर करावे लागतील. महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ समाप्त होणार केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसभेच्या 57 जागांच्या निवडणुकीत सहा जागा या महाराष्ट्राच्या आहेत. याचाच अर्थ राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सहा जागा रिक्त होणार आहेत. या सहा जागांवरील सद्याचे विद्यमान खासदार हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. यामध्ये पीयूष गोयल, पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, विकास महात्मे, संजय राऊत आणि विनय सहस्त्रबुद्धे यांचा समावेश आहे. या सर्व दिग्गज सदस्यांचा कार्यकाळ येत्या 4 जुलैला समाप्त होणार आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून सहा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ( जळगावात राडा, पतसंस्थेच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत दोघांची बंडखोरी, मोठा गदारोळ ) राज्यसभेच्या खासदारांचा निवडणुकीचा कार्यक्रम हा आमदारांच्या संख्येवरुन होतो. महाराष्ट्रात 42 आमदारांचा कोठा आहे. त्याच आधारावर निवडणूक होईल. येत्या निवडणुकीत भाजपच्या तीन जागांपैकी दोन जागा निवडून येतील आणि एक जागा अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. कारण भाजपकडे अतिरिक्त मते आहेत. कारण त्यांचे 106 आमदार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अतिशय रंजनात्मक होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात