जाहिरात
मराठी बातम्या / देश / सुना-मुलांची कटकट सहन करण्याची गरज नाही; सासू-सासरे सुनेला काढू शकतात घराबाहेर - उच्च न्यायालय

सुना-मुलांची कटकट सहन करण्याची गरज नाही; सासू-सासरे सुनेला काढू शकतात घराबाहेर - उच्च न्यायालय

सुना-मुलांची कटकट सहन करण्याची गरज नाही; सासू-सासरे सुनेला काढू शकतात घराबाहेर - उच्च न्यायालय

या प्रकरणात सासू-सासरे अनुक्रमे 69 आणि 74 वर्षांचे आहेत. ते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असल्या कारणाने सुन आणि मुलांमधील वैवाहिक कलहामुळे त्रस्त झाले आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 मार्च : दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) ज्येष्ठ व्यक्तींना मोठा दिलासा दिला आहे. ज्या कुटुंबात सुना-मुलांची सतत कटकट होत असते, अशा घरातील ज्येष्ठ व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने सांगितलं की, सुना-मुलामध्ये सतत वाद होत असेल तर आई-वडिलांना अधिकार आहे की, ते सुनेला घराबाहेर काढू शकतील. उच्च न्यायालयाने सांगितलं की, आई-वडिलांना शांततापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. अशा प्रसंगी सतत वाद करणाऱ्या सुनेला एकत्र घरात राहण्याचा अधिकार नाही. सुनेला घराबाहेर काढू शकतात वयस्कर सासू-सासरे… हाय कोर्टाने सांगितलं की, घरगुती हिंसाचार अधिनियमाअंतर्गत कोणत्याही सुनेला घरातील ज्येष्ठ बाहेर काढू शकतात. त्यांना शांततेने जीवन जगण्याचा अधिकार आहे. न्यायमूर्ती योगेश खन्ना हे एका सुनेने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी करीत होते. त्या अंतर्गत सुनेला सासरी राहण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं की, एकत्र घरात संबंधित संपत्तीचा मालक आपल्या सुनेला घराबाहेर काढण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. हे ही वाचा- एका लग्नाची अजब कहाणी; घोडा-कारऐवजी स्ट्रेचरवर लग्नमंडपात पोहोचला नवरदेव कारण… सुना-मुलांचा त्रास सासू-सासऱ्यांनी का करावा सहन? न्यायमूर्ती खन्ना यांनी सांगितलं की, सद्यपरिस्थितीत दोन्ही सासरची मंडळी वरिष्ठ नागरिक आहेत. त्यांना शांततेनं आयुष्य जगण्याचा आणि मुला-सुनाच्या वैवाहिक वादाचा विरोध करण्याचा अधिकार आहे. न्यायाधीशांनी आपल्या आदेशात सांगितलं की, अशा परिस्थितीत सुना-मुलाला दुसरं पर्यायी घर उपलब्ध करून देण्याबाबतही कोर्टात सांगितलं. न्यायालयाने पुढे सांगितलं की, दाम्पत्यामुळे संबंध टोकाला गेले आहेत. या प्रकरणात मुलाने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात सासू-सासरे अनुक्रमे 69 आणि 74 वर्षांचे आहेत. ते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असल्या कारणाने सुन आणि मुलांमधील वैवाहिक कलहामुळे त्रस्त झाले आहेत आणि त्यांना शांततेने जगण्याचा अधिकार आहे. या प्रकरणात सुनेने एकत्र घरात राहण्याचा अधिकार असल्याची याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात