मराठी बातम्या /बातम्या /देश /

पदभार घेतल्याच्या काही तासांत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा; पत्नीच्या हत्येबरोबरच भ्रष्टाचाराही आरोप

पदभार घेतल्याच्या काही तासांत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा; पत्नीच्या हत्येबरोबरच भ्रष्टाचाराही आरोप

पदभार घेतल्याच्या काही तासांतच मंत्र्यांना आपल्या पदावरुन राजीनामा द्यावा लागला

पदभार घेतल्याच्या काही तासांतच मंत्र्यांना आपल्या पदावरुन राजीनामा द्यावा लागला

पदभार घेतल्याच्या काही तासांतच मंत्र्यांना आपल्या पदावरुन राजीनामा द्यावा लागला

  • Published by:  Meenal Gangurde
पाटना, 19 नोव्हेंबर : बिहारमध्ये नवीन सरकार मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या नेतृत्वात तयार झाली आहे. मात्र अद्यापही वाद थांबलेला नाही. नितीश सरकारमध्ये शिक्षण मंत्रिपत्राची शपथ घेतलेले डॉ. मेवालाल चौधरी (Dr. Mewalal Chaudhary) हे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे विरोधी पक्षाच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान मेवालाल चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदावरुन राजीनामा (Resign) दिला. इतकच नाही तर त्यांच्या राजीनाम्याचा अर्ज राजभवन येथे पोहोचला आहे आणि राज्यपाल फागू चौहान यांनी राजीनाम्याला मंजुरी दिली आहे. तर डॉ. मेवालाल चौधरी यांच्या राजीनाम्यानंतर जेडीयू प्रवक्ता अजय आलोक यांनी आरजेडीवर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, राबडी देवी आणि तेजस्वी केव्हा राजीनामा देणार. यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. वादात सापडलेले शिक्षण मंत्री डॉ. मेवालाल चौधरी यांनी आजच पदभार घेतला होता. दरम्यान ते म्हणाले की, जे माझ्याविरोधात बोलत आहेत आणि माझ्या पत्नीच्या मृत्यूमागे मला जबाबदार धरत आहेत, त्यांच्या विरोधात आजच 50 कोटींचा मानहानीची केस दाखल करणार आणि आजच त्यांना कायदेशीर नोटीसही जाईल. तारापूरचे नवनिर्वाचित जेडीयू आमदार डॉ. मेवालाल चौधरी यांना पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये सामील झाले होते. राजकारणात येण्याच्या पहिल्या वर्षी 2015 पर्यंत ते भागलपूर कृषी विश्वविद्यालयाचे कुलगुरू होते. 2015 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर ते राजकारणात आले. यानंतर जेडीयूमधून तिकीट घेऊन तारापूरमधून निवडणूक लढले आणि जिंकले. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर डॉ. चौधरी नियुक्ती घोटाळ्यात आरोपी असल्याचे समोर आले. कृषी विश्वविद्यालयात नियुक्ती घोटाळा प्रकरणात लबौर ठाण्यात 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आमदाराला कोर्टातून अंतरिम जामीन मिळाली होती. हे ही वाचा-'देशातील सर्व नागरिकांना Covid -19ची लस मोफत द्या'; नारायण मूर्तींनी सुचवला उपाय मेवालाल चौधरी यांची पत्नी नीता चौधरी राजकारणात सक्रिय होत्या. त्या जेडीयूच्या मुंगेर प्रमंडलातील प्रमुख होत्या. 2010-15 मध्ये तारापुरमधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये गॅस सिलेंडरला लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला. माजी आयपीएस अधिकारी अमिताभ कुमार दास यांनी शिक्षण मंत्र्यांवर पत्नीच्या मृत्यू प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी डीजीपी सिंघल यांना पत्रही लिहिलं आहे.

First published:

Tags: Bihar Election

पुढील बातम्या