परीक्षा रद्दच! UGC ने दिलेल्या निर्णयानुसार सप्टेंबरपर्यंत परीक्षा अशक्य : उदय सामंत

परीक्षा रद्दच! UGC ने दिलेल्या निर्णयानुसार सप्टेंबरपर्यंत परीक्षा अशक्य : उदय सामंत

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे.

  • Share this:

मुंबई, 9 जुलै: विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी  पत्रकार परिषदेत सांगितलं.

हेही वाचा...परिस्थिती बघून लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला संवाद

उदय सामंत यांनी सांगितलं की, अंतिम वर्षांच्या परीक्षांसदर्भात आम्ही महाराष्ट्रातील सर्व कुलगुरू आणि विविध शैक्षणिक संस्थांचे संचालकांसोबत चर्चा केली. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत येणार नाही, अशा प्रतिक्रिया सर्व कुलगूरू आणि शिक्षण संचालकांनी दिली आहे. त्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यूजीसीसोबत पत्रव्यवहार करुनच राज्य सरकारने अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, असंही सामंत यांनी यावेळी नमूद केलं.

राज्यातील सर्व कुलगुरुंसोबत चर्चा केली. तसेच अनेक तज्ज्ञांशीही बोलल्यानंतर परीक्षा न घेण्याबाबतच मत नोंदवलं होतं. आपात्कालीन समितीची देखील यासंदर्भात बैठक झाली. यात अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत यूजीसीला पत्र देण्यात आलं होतं. मात्र, तरीही युजीसीनं परीक्षा घ्या, असे आदेश विद्यापीठांना दिले आहेत. यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे.

ही वाचा...फोटो लेते रहो...अमृता फडणवीस यांची सोशल मीडियावर पुन्हा एकदा उडवली खिल्ली!

दरम्यान, यूजीसीने गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी पत्र पाठवत राज्यातील सर्व विद्यापीठांना गाईडलाईन्स पाठवल्या आहेत. अंतिम वर्षांच्या परीक्षा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे निर्देश युजीसीनं दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर पुन्हा एक संभ्रम निर्माण झाला आहे.  भूषण पटवर्धन यांनी पुढचं काय होणार यावर नियोजन न करता पुढे जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही निर्णय घेऊ, असं म्हटलं आहे. यामुळे सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमात ठेवायचं असंच चित्र दिसत असल्याचं सावंत यांना सांगत युजीसीवर निशाणा साधला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 9, 2020, 4:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading