पाटणा, 11 मार्च : केंद्रीय तपास संस्था ईडीने नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी शुक्रवारी बिहारमध्ये अनेक शहरात छापा टाकला. यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या तीन मुली आणि आरजेडी नेत्यांच्या कार्यालये आणि निवासस्थानांचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात ५३ लाख रुपये रोख रक्कम, १९०० अमेरिकन डॉलर, जवळपास ५४० ग्रॅम सोने सोन्याचे दीड किलो दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. दक्षिण दिल्लीत लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव राहत असलेल्या एका घराची झडती घेण्यात आली.
दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी परिसरात असलेल्या घराचा पत्ता इके इन्फोसिस्टिम प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे नोंद आहे. या कंपनीचाही या प्रकरणात समावेश आहे. मात्र यादव कुटुंबिय या घराचा राहण्यासाठी वापर करत आहेत. ईडीने पाटणा, फुलवारी शरीफ, दिल्ली, एनसीआर, रांची, मुंबईत लालू प्रसाद यादव यांच्या मुली रागिनी यादव, चंदा यादव आणि हेमा यादव यांच्यासह आरजेडीच्या माजी आमदारांच्या कार्यालयावरही छापे टाकले.
Exclusive: 'डॉलरला आत घ्या..', लालूंच्या चौकशीसाठी आलेल्या CBI अधिकाऱ्यांना फुटला घाम
केंद्रीय सुरक्षा दलाची कडक सुरक्षा व्यवस्था या छाप्यावेळी होती. माजी आमदार अबू दोजाना यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, मला नाही माहिती की हे लोक माझ्या घरी काय शोधायचा प्रयत्न करत आहेत. मला इतकंच माहिती आहे की आम्ही भाजपला न जुमानल्याने ही किंमत मोजत आहे. ईडीने ब्रह्म सिटी प्रायव्हेट लिमिटेड, एलीट लँडबेस प्रायव्हेट लिमिटेड, व्हाइटलँड कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, मेरिडियन कंन्स्ट्रक्शन इंडिया लिमिटेड यांसारख्या कंपन्यांमध्येही छापे मारण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.