मराठी बातम्या /बातम्या /देश /

Tsunami Indian Ocean : पूर्व तिमोरमध्ये भूकंप, हिंदी महासागरात त्सुनामीचा Alert, भारताच्या 'या' राज्यांना धोक्याची घंटा

Tsunami Indian Ocean : पूर्व तिमोरमध्ये भूकंप, हिंदी महासागरात त्सुनामीचा Alert, भारताच्या 'या' राज्यांना धोक्याची घंटा

पूर्व तिमोरच्या (Timor-Leste) समुद्र किनारपट्टीला भूंकपाचे धक्के बसले. दरम्यान याचा परिणाम हिंदी महासागरात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (earthquake)

पूर्व तिमोरच्या (Timor-Leste) समुद्र किनारपट्टीला भूंकपाचे धक्के बसले. दरम्यान याचा परिणाम हिंदी महासागरात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (earthquake)

पूर्व तिमोरच्या (Timor-Leste) समुद्र किनारपट्टीला भूंकपाचे धक्के बसले. दरम्यान याचा परिणाम हिंदी महासागरात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (earthquake)

  • Published by:  Sandeep Shirguppe

नवी दिल्ली, 27 मे : पूर्व तिमोरच्या (Timor-Leste) समुद्र किनारपट्टीला 6.2 रिश्टर स्केलचे भूंकपाचे आज (दि. 27) शुक्रवारी धक्के बसले. दरम्यान याचा परिणाम हिंदी महासागरात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंदी महासागरात त्सुनामी येईल अशी भीती व्यक्त केली जात असून तसा इशाराही देण्यात आला आहे. (Chance of a tsunami in the Indian Ocean) झालेल्या भुंकपामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. याचे मुख्यकेंद्र (Lospalos) नावाच्या ठिकाणापासून 38 किमी उत्तर-पूर्वेला होते. भूकंपाची खोली ४९ किमी असल्याची माहिती यूएस सायंटिफिक इन्स्टिट्यूट यूएसजीएसने ट्विट करत भूकंपानंतर इशारा दिला आहे.

भूकंपानंतर केवळ यूएसजीएसनेच नाही तर इंडियन ओशन त्सुनामी वॉर्निंग अँड मिटिगेशन सिस्टम (IOTWMS) नेही सुनामीचा इशारा दिला आहे. पूर्व तिमोरच्या राजधानीत भूकंपाचे धक्के अनेकांना जाणवले. यामध्ये एकाने दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप खूपच वेगाने आला आणि लवकर संपला. यानंतर लोक आपले काम पूर्ण करण्यासाठी बाहेर पडले. या भूकंपाने बोलिव्हियनची राजधानी पाझ आणि पेरू देशातील शहर असलेल्या अरेक्विपा, टॅक्ना आणि कुस्को या शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

हे ही वाचा : Damini App : काळजी नसावी! वीज कुठे पडणार हे 30 मिनिटं आधी समजणार, राज्य शासनाकडून नवीन Mobile App लाँच

पूर्व तिमोर हे पृथ्वीवरील असे एक ठिकाण आहे याला रिंग ऑफ फायर (ring of fire) असे म्हणतात. भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी या सगळ्या घटना या भागात होतात. या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये उत्तर सुमात्रामध्ये ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्यात 12 लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपांमुळे ज्वालामुखीचा उद्रेक होतो. किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतात. कधी कधी त्सुनामीही येते असे तज्ञाचे मत आहे. दरम्यान हिंदी महासागरात त्सुनामी आल्यास भारतातील काही राज्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : लडाखमध्ये 26 जवान प्रवास करणाऱ्या सैन्याच्या गाडीला जबर अपघात; आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

2004 मध्ये झालेल्या भूकंपाने लाखो लोक मृत्यूमुखी

2004 मध्ये सुमात्रा किनारपट्टीवर आलेल्या 9.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी आली होती. त्यामुळे तिमोर आणि इंडोनेशियातील 2 लाख 20 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. सध्या, पूर्व तिमोरची लोकसंख्या सुमारे 1.3 दशलक्ष आहे. हा आग्नेय आशियातील सर्वात तरुण देश आहे. अलीकडेच इंडोनेशियापासून अलिप्त होत 20 वा स्वातंत्र्य: दिन साजरा करण्यात आला होता.

First published:

Tags: Earthquake, Tsunami, Weather forecast, Weather update