जाहिरात
मराठी बातम्या / देश / राष्ट्रपती पदक विजेता पोलीस उप अधीक्षकच करत होता दहशतवाद्यांना मदत, घातपाताचा कट उधळला

राष्ट्रपती पदक विजेता पोलीस उप अधीक्षकच करत होता दहशतवाद्यांना मदत, घातपाताचा कट उधळला

राष्ट्रपती पदक विजेता पोलीस उप अधीक्षकच करत होता दहशतवाद्यांना मदत, घातपाताचा कट उधळला

राष्ट्रपती पदक सन्मानित पोलिस अधिकाऱीच करत होता दहशतवाद्यांना मदत, काश्मीरमध्ये सुरक्षादलाने 2 दहशतवाद्यांसह डीएसपीला घेतलं ताब्यात.

  • -MIN READ
  • Last Updated :

कुलगाम, 12 जानेवारी : काश्मीरमधील कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांसोबत एका गाडीमध्ये पोलीस उप अधिक्षकच सापडल्यानं खळबळ उडाली आहे. कुलगाममध्ये चेकिंगवेळी एका गाडीतून हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतावाद्यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत जम्मू काश्मीरमधील पोलीस उपअधिक्षकसुद्धा होते. त्यालाही सुरक्षा दलाने ताब्यात घेतलं आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुजाहिद्दीनचा दोन नंबरचा दहशतावादी सय्यद नवीद मुश्ताक उर्फ नवीद बाबू याला सुरक्षादलाने ताब्यात घेतलं आहे. रियाज नायकू याच्यानंतर त्याचाच नंबर लागतो. दहशतवाद्यांसोबत पकडण्यात आलेल्या डीएसपींचे नाव देविंदर सिंग असल्याचे समजते. ते एअरपोर्ट सिक्युरीटीमध्ये तैनात होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डिएसपी दहशतावाद्यांना बाहेर जाण्यासाठी मदत करत होता. त्या डीएसपीच्या मदतीने दहशतवादी दिल्लीत येण्याच्या तयारीत होते. दहशतवाद्यांसोबत डीएसपी सापडताच त्याच्या घरीही छापा टाकण्यात आला. यामध्ये 5 ग्रेनेड, 3 एके-47 असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आळा आहे. डीएसपीला दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याची मोहिम दक्षिण काश्मीरचे डीआयजी अतुल गोयल यांच्या नेतृत्वाखाली झाली. डीएसपी सिंग श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्यूटीसाठी आहेत.  दहशतवाद्यांविरोधात कारवाया केल्यामुळे त्यांना डीएसपी पदावर बढती देण्यात आली होती. गेल्या वर्षी 15 ऑगस्टला राष्ट्रपती पदकानेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. ‘सरकारने आदेश दिला तर POK बद्दल योग्य कारवाई करू’,मनोज नरवणेंचं वक्तव्य

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात