हैदराबाद, 11 एप्रिल : तेलंगणामध्ये दोन तरुणांनी दारूच्या नशेत एकमेकांशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (drunk youths got married) यातील एकाचे वय हे 21 तर दुसऱ्याचे वय 22 आहे. माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, दुमापलापेट गावात दोन व्यक्ती एका ताडीच्या दुकानावर भेटले आणि एकमेकांचे मित्र बनले. यानंतर ते नेहमीच ते दारू पिण्यासाठी भेटू लागले.
मेडक जिल्ह्यातील चंदूर येथे राहणाऱ्या 22 वर्षाच्या रिक्षा चालकाने जोगीपेठ येथील सांगारेड्डी जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या 21 वर्षाच्या तरुणासोबत लग्न केले. ही घटना 1 एप्रिलला समोर आली. ज्यावेळी एकमेकांनी लग्न केले त्यावेळी ते दोन्हीही दारुच्या नशेत बेधुंद होते. त्यांनी हे लग्न जोगीनाथ गुट्टा मंदिरात केले. तर लग्न झाल्यानंतर दोघंही घरी निघून गेले.
एक लाख रुपयांची पोटगी
काही दिवसानंतर जोगीपेठ येथील युवक रिक्षाचालकाच्या घरी गेला आणि त्याच्या आईवडिलांना आपल्या लग्नाबाबत सांगितले. त्याने रिक्षाचालकाच्या आई-वडिलांना सांगितले की, त्याला त्यांच्या मुलासोबत राहू दिले जावं, कारण त्याच्याजवळ राहण्यासाठी कोणतीही जागा नाही. अनेक विनंती केल्यानंतरही रिक्षाचालकाच्या पालकांनी त्याला घरातही घेतलं नाही. दरम्यान, या बाचाबाचीनंतर जोगीपेठ येथील तो युवक याप्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने रिक्षाचालकापासून दूर राहण्यासाठी रिक्षाचालकाच्या आईवडिलांना एक लाख रुपयांची पोटगी मागितली.
KL राहुल पहिल्याच बॉलवर क्लिन बोल्ड होताच गर्लफ्रेंड आथियाची अशी होती रिअॅक्शन
यानंतर दोघांनी ठरविले की, या गोष्टीला पोलिसांच्या समोर घेऊन जाऊ नये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणामुळे दोन्ही पक्षांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी आपापसात चर्चा करून प्रश्न सोडवला. वाटाघाटीनंतर, जोगीपेठ येथील व्यक्तीने रिक्षाचालकाच्या कुटुंबाकडून १०,००० रुपयांचे वनटाइम सेटलमेंट करण्यास सहमती दर्शवली. नंतर दोन्ही पक्षांच्या संमतीने ते वेगळे झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.