जाहिरात
मराठी बातम्या / देश / मोठी बातमी: पंजाबमध्ये पाकिस्तानी ड्रोनमधून फेकले दोन बॉक्स, BSF कडून गोळीबार

मोठी बातमी: पंजाबमध्ये पाकिस्तानी ड्रोनमधून फेकले दोन बॉक्स, BSF कडून गोळीबार

Drone drops bombs in Amritsar, flees to Pakistan after BSF opens fire

Drone drops bombs in Amritsar, flees to Pakistan after BSF opens fire

पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान(Indo Pak Border) सीमेलगत पाकिस्तानी ड्रोनमधून दोन बॉक्स फेकल्याचा संशय येताच बीएसएफ (BSF) जवानांनी ड्रोनवर गोळीबार करत पाकिस्तानचा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी: पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान(Indo Pak Border) सीमेलगत पाकिस्तानी ड्रोनमधून दोन बॉक्स फेकल्याचा संशय येताच बीएसएफ (BSF) जवानांनी ड्रोनवर गोळीबार करत पाकिस्तानचा डाव सुरक्षा दलांनी उधळून (Drone drops bombs in Amritsar, flees to Pakistan after BSF opens fire)लावला आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार असून तेथील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानचा डाव बीएसएफ जवानांनी हाणून पाडला. बीएसएफच्या गुरुदासपूर सेक्टरमध्ये 73 बटालियनच्या जवानांना अमृतसर, पंजाबमधील अजनाला तहसीलमधील पंजग्राहियन सीमा चौकीवर ड्रोन दिसले त्यानंतर सतर्क जवानांनी सीमेवरून उडणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार केला. आणि दहशतवादी प्रयत्न हाणून पाडला. ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या दिशेने काहीतरी फेकल्याचा बीएसएफ जवानांना संशय आला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास बीएसएफच्या पंजग्राहियन बीओपीवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना पाकिस्तानी ड्रोन भारत-पाक सीमेवर उडताना दिसला. यानंतर सुरक्षेत तैनात जवानांनी ड्रोनवर गोळीबार सुरू केला. या प्रकरणाला दुजोरा देताना बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीएसएफ जवानांनी सीमेवर उडणाऱ्या ड्रोनवर गोळीबार केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या दिशेने काही वस्तू फेकल्याचा संशय असून, दोन ठिकाणी स्फोटके सापडली. आता मोठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाकिस्तानातून स्फोटक पदार्थ, शस्त्रे आणि हेरॉईन सोडले जाण्याची भीती आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच, 15 जानेवारी रोजी भारत-पाक सीमेच्या 2 किलोमीटर आधी 5 किलो स्फोटक वस्तु जप्त करण्यात आल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात