मराठी बातम्या /बातम्या /देश /

आता ड्रायव्हिंग लायसन्ससह 18 सेवा ऑनलाइन; RTO कार्यालयात जायची गरज नाही!

आता ड्रायव्हिंग लायसन्ससह 18 सेवा ऑनलाइन; RTO कार्यालयात जायची गरज नाही!

वाहन चालवण्याचा परवाना (Driving License) काढणं किंवा वाहनाची नोंदणी (Vehicle Registration) अशी कामं करायची म्हटलं की आरटीओ (RTO) कार्यालयातील गर्दी, संथ कारभार, खेटे घालावे लागण्याची शक्यता या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात.

मुंबई, 5 मार्च : वाहन चालवण्याचा परवाना (Driving License) काढणं किंवा वाहनाची नोंदणी (Vehicle Registration) अशी कामं करायची म्हटलं की आरटीओ (RTO) कार्यालयातील गर्दी, संथ कारभार, खेटे घालावे लागण्याची शक्यता या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. आता मात्र हे चित्र बदलणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं (Road Transport and Highways Ministry) लायसन्स, लर्निंग लायसन्स, वाहनाची नोंदणी आदी आरटीओशी संबधित 18 सेवा आता ऑनलाइन उपलब्ध केल्या आहेत. आता ही कामे करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. लोकांना घर बसल्या ही कामे करता येतील. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय या सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. याकरता आधारकार्ड (Aadhar card)असणं आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र आधारकार्डशी जोडणं आवश्यक आहे. यासंदर्भात एक अधिसूचनाही (Notification) मंत्रालयानं जारी केली आहे. मंत्रालयानं एक ट्विट करून ही माहिती दिली आहे.

1) लर्निंग लायसन्स

2) ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअल (यासाठी पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नसते)

3) डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स

4) ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता बदलणे, नोंदणी प्रमाणपत्र बदल

5) आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स

6) लायसन्सवरील वाहनाचा क्लास रद्द करणे

7) वाहनाच्या तात्पुरत्या नोंदणीसाठी अर्ज करणं

8) फुल्ली बिल्ट बॉडीच्या वाहनाच्या नोंदणीसाठी अर्ज करणं

9) नोंदणी प्रमाणपत्राच्या डुप्लिकेटसाठी अर्ज

10) एनओसीसाठी अर्ज करणं

11) वाहनाच्या ओनरशिप ट्रान्सफरसाठी नोटीस

12) वाहनाच्या ओनरशिप ट्रान्सफरसाठी अर्ज

13) नोंदणी प्रमाणपत्रावर पत्ता बदल

14) अधिकृत वाहन प्रशिक्षण केंद्रातून वाहन चालक प्रशिक्षण परवान्यासाठी अर्ज

15) राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी वाहन नोंदणी करण्यासाठी अर्ज

16) राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी नवीन नोंदणी चिन्ह देण्यासाठी अर्ज

17) उच्च किमतीच्या वाहन खरेदीची नोंदणी

18) उच्च किमतीच्या वाहन खरेदी करार रद्द करणं

या सेवा आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार असून, वाहन चालकांचा वेळ आणि ऊर्जा वाचणार आहे. त्यांना अगदी सहजपणे घरबसल्या ही कामे पूर्ण करता येणार आहेत. आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी होण्यासाठी आणि या यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास यामुळं मदत होणार आहे. यामुळं आरटीओ कार्यालयांची कार्यक्षमता वाढेल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

First published:

Tags: License, Nitin gadkari, Online, RTO