Home /News /national /

चीन, पाकिस्तानला धडकी! रणगाडे उद्ध्वस्त करणारी स्वदेशी मिसाईल्स तयार; नगरमध्ये यशस्वी चाचणी

चीन, पाकिस्तानला धडकी! रणगाडे उद्ध्वस्त करणारी स्वदेशी मिसाईल्स तयार; नगरमध्ये यशस्वी चाचणी

महाराष्ट्रात नगरच्या ACC&S मध्ये आज आणखी एक इतिहास रचला गेला. क्षेपणास्त्रांबाबत स्वयंपूर्ण भारताचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होऊ शकतं.

    अहमदनगर, 23 सप्टेंबर : लेसर गायडेड मिसाईल्सच्या निर्मितीत भारताने आज आणखी एक मोलाची भर घातली. नगरच्या Armoured Corps Centre and School मध्ये DRDO ने स्वदेशी बनावटीच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची (Laser-guided Anti-tank Guided Missile) यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीच याविषयी माहिती दिली आहे. आधुनिक क्षेपणास्त्र निर्मितीत आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण व्हायच्या दृष्टीने यात मोलाची भर पडली आहे. पाकिस्तान आणि चीनच्या आक्रमक भाषेला या क्षेपणास्त्र चाचणीने चोख उत्तर मिळालं आहे. DRDO ने रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राचा पल्ला 4 किलोमीटरपर्यंतचा असून MBT Arjun Tank वरून याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. अहमदनगरच्या Armoured Corps Centre and School मध्ये अर्जुन रणगाड्यावरून ही क्षेपणास्त्र डागली गेली, तेव्हा एक नवा इतिहास रचला गेला. लांबूनही या मिसाईल्सचा वापर नियंत्रित करता येतो. कारण ही लेसर गायडेड मिसाईल्स  आहेत. DRDO च्या चाचणीची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी Twitter वरून दिली. या  क्षेपणास्राची यशस्वी चाचणी झाल्यानंतर  संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओच्या संशोधक व अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. Defence Research and Development Organisation म्हणजेच DRDO भारतीय सैन्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणांवर संशोधन व त्यांची निर्मिती करते. यामध्ये अत्याधुनिक शस्रास्र, उपकरणांचा विकास करणं, संशोधन करणं, इतर संस्थांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या सहाय्यानी नवीन चाचण्या करणं, संशोधन कार्यक्रम राबवणं या कामांचा समावेश असतो. त्याचबरोबर या संस्थेनं आतापर्यंत लढाऊ विमानं, रॉकेट, आखूड पल्ल्याच्या बंदुकी, रिमोट व्हेईकल, क्षेपणास्र, रडार अशी अनेक अत्याधुनिक उपकरणं तयार केली आहेत. या क्षेपणास्राची यशस्वी चाचणी झाली असून त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील संशोधन सुरू आहे. या क्षेपणास्राच्या माध्यमातून भारत आपल्या लष्कराच्या वाहनांचं संरक्षण करू शकणार आहे. पुण्यामध्ये असलेल्या आर्मामेंट रीसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्युटने (ARDE) हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (HEMRL) आणि इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्युटच्या (IRDE) मदतीने हा रणगाडा विकसित केला आहे. या क्षेपणास्राच्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ट्विटद्वारे अभिनंदन केलं.  'अहमदनगरमध्ये लेझर गायडेड क्षेपणास्राच्या यशस्वी चाचणीसाठी DRDO चं अभिनंदन. DRDO च्या टीमचा संपूर्ण भारताला अभिमान आहे. भविष्यातदेखील अशाच पद्धतीने नवीन शस्रास्र ते विकसित करतील, अशी आशा आहे. युद्ध होत नसलं तरीही लष्करीदृष्ट्यया सज्ज असणं ही सध्या काळाची गरज आहे. भारताने अण्वस्रसज्जतेसोबत लष्करी उपकरणं आणि क्षेपणास्र निर्मितीमध्ये मोठं यश मिळवलं आहे. स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून त्याच्यावर आधारित उपकरणं तयार करण्यात भारतीय शास्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. त्यातच आता या नव्या रणगाड्याची भर पडली आहे. हा रणगाडा भारतीय लष्कराची शक्ती नक्कीच वाढवेल.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: DRDO, Missile

    पुढील बातम्या