नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान News18 ची महिला रिपोर्टर ग्राऊंडवर होती. या हिंसाचारादरम्यान एका पत्रकाराला मारहाण झाली. यावेळी CNN-News18 ची महिला रिपोर्टर रुनझुन शर्मा त्यांच्यासोबत होती. या ग्राऊंड रिपोर्टिग दरम्यान तिला आलेला अनुथव थरारक होता. वाचा तिच्याच शब्दात दिल्ली हिंसाचाराचा थरकाप उडविणारा अनुभव… मला असं वाटतं होतं की मी सिनेमा बघघेत. ते दृश्य खूप भीतीदायक होतं. लोकांच्या हातात तलवारी, लोखंडी रॉड आणि हॉकी स्टिक्स होत्या. त्यापैकी अनेकांनी हेल्मेट घातलं होतं आणि ते सर्व ‘जय श्री राम’चा नारा देत होते. ते एकात घरात शिरले, त्यावेळी विचित्र असा आवाज आला. काही मिनिटांनंतर मला घराच्या खिडकीतून आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. तेथील एक मोठा नाला ओलांडून मी उभी होते. यावेळी माझ्य़ासोबत आणखी दोन रिपोर्टर होते. आम्ही दिल्लीतील उत्तर पूर्वेकड़ील खाझोरी खास भागात होतो. समोर सुरू असलेला हिंसाचार शूट करण्याची आम्हाला परवानगी नव्हती. तुमच्याजवळील मोबाइल फोन बाहेर काढून काहीही रेकॉर्ड करू नका अथवा फोटा काढून नका. फक्त या घटनेची मजा घ्या, असं म्हणत एका जमावाने आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. आमच्या डोळ्यासमोर दगड फेक केली जात होती. अनेक ठिकाणी असिड़ फेकले जात होते. येथील अनेक धार्मिक स्थळांना जाळण्याचा प्रयत्न केला जात होता. आम्हाला याच्या जवळ जाण्याची परवानगी नव्हती. मात्र आगीचा काळा धुर संपूर्ण आकाशभर पसरला होता. मी जागेवर उभे होते. काहीच करु शकत नव्हते. मात्र पोलीस या जमावापासून काही किलोमीटर अंतरावर का उभे होते ते घटनास्थळी का आले नाहीत. जर रिपोर्टरना ही माहिती मिळू शकते तर पोलिसांनाही मिळू शकते. काही वेळाने घर जाळल्यानंतर जमान आरडाओरडा करून निघून गेला. त्यानंतर आम्हाला येथील फोटो काढण्याची परवानगी देण्यात आली. काही वेळाने आम्ही त्यापुढील जुन्या मौजपुर भागात गेलो. यावेळी हत्यारं घेऊन जाणारा जमाव आम्ही पाहिला. या भागात 144 सेक्शन लागू केल्यानंतर जमाव तेही हत्यारांसह फिरत होता. 200 ते 300 चा जमाव एका देवस्थानाची भिंत तोडत होता.
As houses are being burned to the ground in Khazoori Khas in North East Delhi- there is NO police present in the area.
— Runjhun Sharma (@Runjhunsharmas) February 25, 2020
This is 3rd day of #DelhiRiots. Why is this still on? pic.twitter.com/ZEzRZEN6Do
यावेळी मी NDTV रिपोर्टर सौरभ शुक्ला आणि अरविंद गुनसाकेर यांच्यासोबत होते. आम्ही गाडी थांबवली. तो मुख्य रस्ता नव्हता. शिवाय फ्लायओव्हरनंतरही नव्हता. त्यावेळी आम्ही टिळा लावलेले काही पोलीस पाहिले. ते जमावाला घेऊन जात होते. यानंतर अरविंदने त्याच्या शर्टाच्या पॉकेटमध्य़े ठेवलेल्या मोबाइलने रेकॉर्डींग करायला सुरुवात केली. काही मिनिटांतच हातात लोखंडी सळी व हॉकी स्टिक्स घेतलेले 50 जण आमच्या जवळ आले. आम्हाला काही कळायच्या आतच त्यांनी अरविंदशी अरेरावी सुरू केली. अधिकाधिक माणसं आमच्या दिशेने येत होती. त्यानंतर मी आणि सौरभ शुक्ला जमावाला शांत करण्य़ाचा प्रयत्न करत होतो. आम्हाला माफ करा…चूक झाली…आम्ही पत्रकार आहोत. पण याचा काही फायदा होत नव्हता. अरविंदला मारहाण सुरू होती. त्यांनी अरविंदला त्याच्या मोबाइलमधील प्रत्येक फोटो आणि व्हिड़िओ डिलीट करायला सांगितला. त्यानंतर जमावाने अरविंदला सोडले. त्यांच्या तोंडातून रक्त वाहत होते. त्याचा एक दातही तुटला होता. अरविंद आणि मी पार्क केलेल्या कारजवऴ पोहोचतो तोच आम्हाला लक्षात आलं, आमच्या सोबत असलेला दुसरा रिपोर्टर सौरभ शुक्ला जमावात होता. ते त्याला मोबाइलमधील प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ डिलीट करायला सांगत होते, अन्यथा फोन आगीत फेकून देऊ अशी धमकी देत होते. आम्ही पुन्हा जमावाच्या दिशेने धाव घेतली. माझा फोन ट्रॅक पॅन्टीत होता. माझ्या फोनबद्दल विचारले असता तो कारमध्ये असल्याचे मी सांगितले. मी प्रार्थना केली की त्यांनी माझी झडती घेऊ नये, आणि सुदैवाने त्यांनी ते केलं नाही. त्यानंतर जमाव आम्हाला आमच्या धर्माबद्दल विचारत होते. मी त्यांना माझं प्रेस आयडी दाखवलं. त्यामध्ये माझं आडनाव शर्मा होतं. माझ्यासोबत असलेल्या दोघांकडूनही ते धर्माबाबत विचारणा करीत होते. आमच्या धर्माविषय़ी खात्री झाल्यावर त्यांनी आम्हाला सोडले. आम्ही हात जोडून आम्ही निघालो. त्यांना शेवटचा जय श्री रामचा निरोप हवा होता.