जाहिरात
मराठी बातम्या / देश / ‘पतंजली’ला दान दिल्यास टॅक्समधून सूट, जाणून घ्या केंद्र सरकारचा नवा निर्णय

‘पतंजली’ला दान दिल्यास टॅक्समधून सूट, जाणून घ्या केंद्र सरकारचा नवा निर्णय

‘पतंजली’ला दान दिल्यास टॅक्समधून सूट, जाणून घ्या केंद्र सरकारचा नवा निर्णय

मोदी सरकारनं (Modi Government) हरिद्वारमधील ‘पतंजली रिसर्च फाऊंडेशन ट्स्ट’ला (Patanjali research foundation trust) संशोधन संस्थेचा दर्जा दिल्यामुळे यापुढं संस्थेला दिलेल्या दानाचे (Donation) तपशील दाखवून आयकरातून सूट (Concession in income tax) मिळवता येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हरिद्वार, 15 जुलै : मोदी सरकारनं (Modi Government) हरिद्वारमधील ‘पतंजली रिसर्च फाऊंडेशन ट्स्ट’ला (Patanjali research foundation trust) संशोधन संस्थेचा दर्जा दिल्यामुळे यापुढं संस्थेला दिलेल्या दानाचे (Donation) तपशील दाखवून आयकरातून सूट (Concession in income tax) मिळवता येणार आहे. आयकर विभागाशी संबंधित सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) या संस्थेनं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना ‘पतंजली’ला सढळहस्ते दान करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दान आणि कराचा संबंध जेव्हा आयकर विभागाकडून एखाद्या कंपनीला संशोधन संस्था असल्याचा दर्जा दिला जातो, तेव्हा त्या कंपनीला दिलेल्या दानाचे तपशील दाखवून करदाते आपल्या करात सूट मिळवू शकतात. म्हणजेच या कंपनीला करदाता जितकं दान देईल, तितकी रक्कम त्याच्या करपात्र उत्पन्नातून वजा केली जाईल. संशोधनाला प्रोत्साहन आणि निधी मिळावा, या उद्देशाने ही तरतूद करण्यात येते. करात सवलत मिळणार असल्यामुळे नागरिक सढळ हस्ते मदत करतात आणि संस्थेलाही संशोधनासाठी निधी उपलब्ध होतो. 2021-22 ते 2026-27 या कालावधीसाठीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून या कालावधीत दिलेलं दान हे करातून सवलत मिळण्यासाठी पात्र ठरणार आहे. हे वाचा - ‘मविआ’ला आमदारांवर विश्वास नाही म्हणून निवडणूक हात वर करून घेणार : फडणवीस लवकरच येणार IPO पतंजली कंपनी वेगानं प्रगती करत असून कंपनीच्या उत्पादनांना बाजारात जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. ‘सोया रुची’ या कंपनीचा लवकरच FPO येत असल्याची घोषणा त्यांनी केली, तर लवकरच पतंजलीच्या IPO बाबतची घोषणा करू, असंही ते म्हणाले. 2025 सालापर्यंत हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीला पतंजलीनं मागं टाकलेलं असेल, असा विश्वास व्यक्त करतानाच पुढील 3 ते 4 वर्षांत कंपनीला पूर्णतः कर्जमुक्त करण्याचं आपलं ध्येय आहे, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात