मराठी बातम्या /बातम्या /देश /महागाई अलर्ट! देशाच्या राजधानीतच गॅस सिलेंडर महागलं, उद्यापासून होणार नवे दर लागू

महागाई अलर्ट! देशाच्या राजधानीतच गॅस सिलेंडर महागलं, उद्यापासून होणार नवे दर लागू

सर्व घटकांना देशातल्या वाढत्या महागाईची झळ बसत आहे. यात सामान्य नागरिक मात्र हैराण झाला आहे.

सर्व घटकांना देशातल्या वाढत्या महागाईची झळ बसत आहे. यात सामान्य नागरिक मात्र हैराण झाला आहे.

सर्व घटकांना देशातल्या वाढत्या महागाईची झळ बसत आहे. यात सामान्य नागरिक मात्र हैराण झाला आहे.

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी (LPG) घरगुती सिलिंडरच्या (Domestic gas cylinder price rise) किमती दिल्लीत (Delhi) 50 रुपयांनी वाढल्या आहेत. एएनआयनं (ANI) याबाबतचं वृत्त दिलं आहे.

14.2 किलोग्रॅम एलपीजीच्या नव्या किमती (new price) दिल्लीमध्ये 769 रुपये असतील. या किमती राष्ट्रीय राजधानीमध्ये (national capital) उद्या 12 वाजल्यापासून लागू होणार आहेत. फेब्रुवारीच्या महिन्यात दुसऱ्यांदा या किमती वाढल्या आहेत.

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (oil marketing companies) विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर्सच्या किमती 4 फेब्रुवारीपासून 25 रुपयांनी वाढवल्या आहेत. विशेष म्हणजे, एलपीजी गॅस सिलिंडर्सच्या किमती अशावेळी वाढल्या आहेत जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे भावसुद्धा (petrol and diesel price rise) आधीच गगनाला भिडलेले आहेत.

स्वयंपाकाचा एलपीजी गॅस क्रूड ऑईल (crude oil) आणि नैसर्गिक वायूपासून (natural gas) तयार होतो. आज सलग सहाव्या दिवशी तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेल 79.06 रुपयांनी विकतं आहे. मुंबईत पेट्रोल 95.21 रुपये तर डिझेल 86.04 रुपये प्रती लिटर झालं आहे. हा आजवरचा सर्वात जास्त दर आहे. कलकत्त्यामध्ये पेट्रोल 90.01 आणि डिझेल 82.65 वर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आज 90.96 रुपये तर डिझेल 84.16 रुपये इतकं झालं आहे.

हेही वाचा वाहनधारकांनो सावधान! उद्या मध्यरात्रीपासून FASTag होणार अनिवार्य

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानं माल वाहतूकदारांच्या दरातही 10 ते 12 टक्क्यांची वाढ झालेली आहे. भाज्या आणि डाळीनंतर आता खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत.

First published:

Tags: Delhi, LPG Price, Petrol and diesel price