मराठी बातम्या /बातम्या /देश /

वाहनधारकांनो सावधान! उद्या मध्यरात्रीपासून FASTag होणार अनिवार्य, सरकारचे निर्देश

वाहनधारकांनो सावधान! उद्या मध्यरात्रीपासून FASTag होणार अनिवार्य, सरकारचे निर्देश

सरकारने आजवर अनेकदा फास्टॅग बंधनकारक करण्याची मुदत पुढं ढकलली आहे. मात्र आता देशभरात तो अनिवार्य केला जाणार आहे.

सरकारने आजवर अनेकदा फास्टॅग बंधनकारक करण्याची मुदत पुढं ढकलली आहे. मात्र आता देशभरात तो अनिवार्य केला जाणार आहे.

सरकारने आजवर अनेकदा फास्टॅग बंधनकारक करण्याची मुदत पुढं ढकलली आहे. मात्र आता देशभरात तो अनिवार्य केला जाणार आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानं (Ministry of road and transport) रविवारी सांगितलं, की फास्टॅग न लावता रा महामार्गांच्या (NH) टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांना 15-16 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून (midnight of 15-16 February) दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

रविवारी रात्री 12 पासून सर्व टोल प्लाझावर (toll plaza) कॅशलेन (cash lane) बंद होणार आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियानं (NHAI) याबाबत आदेश दिले आहेत. आता वाहनांना केवळ फास्टॅगच्या माध्यमातूनच टोल भरावा (toll payment) लागणार आहे. आज रात्रीपासून फास्टॅग अनिवार्य (fastag compulsory) केला जाणार आहे. याबाबत सरकारकडून निर्देशही देण्यात आलेले आहेत.

केंद्र सरकारनं टोल प्लाझावर टोल कलेक्शन सोपं आणि सुरक्षित बनवण्यासह टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबचलांब रांगांपासून सुटका मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 15-16 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सर्व राष्ट्रीय महामार्ग फास्टॅग असणारे होतील. रोख रकमेत (cash) टोल वसूलणं बंद होणार आहे. रविवारी काढलेल्या एका निवेदनामध्ये मंत्रालयानं हे स्पष्ट केलं, की हे पाऊल डिजिटल गोष्टींना प्रोत्साहन देण्यासह प्रतीक्षाकाळ कमी करण्यासाठी उचललं गेलं आहे.

हेही वाचा2.8 लाख लोकांना मिळेल रोजगार, ही परदेशी कंपनी भारतात लवकरच सुरू करणार युनिट

यातून पेट्रोलचीही (petrol) बचत होणार आहे. सोबतच लोकांना न थांबता पुढे सरकता येईल. सरकारनं फास्टॅगबाबत दोन श्रेणी बनवल्या आहेत. एक आहे एम (M) श्रेणी. यात अशी चारचाकी वाहनं असतील, हातून प्रवाशांना एका जागेहून दुसऱ्या जागी नेलं जातं. दुसरी श्रेणी आहे एन (N) यात केवळ सामान किंवा समानसोबत प्रवाशांना नेलं जातं.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांनी रविवारी सांगितलं, की फास्टॅगच्या अंमलबजावणी मुदतीला पुढे ढकललं जाणार नाही. वाहनधारकांनी तत्काळ या इ-पेमेंट (e-payment) सुविधेचा अवलंब करणं सुरू करावं. फास्टॅग टोल प्लाझावर इ-पेमेंटची सुविधा देऊ करतं. ही सुविधा 2016 मध्ये सादर केली होती. टॅग अनिवार्य केल्यामुळे हेसुद्धा निश्चित करता येईल, की वाहनं टोल प्लाझावरून न थांबता जात राहतील. गडकरी यांनी नागपूर विमानतळावर फास्टॅग संदर्भातील एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं, की सरकारनं फास्टॅग नोंदणीसाठी दोन ते तीन वेळा वाढवलं. मात्र आता यापुढं ही कालमर्यादा वाढवणं शक्य होणार नाही. हरेकानं लवकरात लवकर फास्टॅगची खरेदी करावी.

केंद्र सरकारनं बंधनकारक फास्टॅगची (compulsory Fastag) कालमर्यादा 1 जानेवारी 2021 पासून वाढवून 15 फेब्रुवारी 2021 केली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, आता फास्टॅग लागू करणारे बँक सिक्युरिटी डिपॉझिटव्यतिरिक्त कुठलंच किमान बॅलन्स खात्यात (minimum balance) ठेवणं बंधनकारक करू शकत नाहीत. वाहनधारकाला टोल प्लाझावरून जाण्याची अनुमती तोवर दिली जाईल जोवर फास्टॅग खात्यात निगेटिव्ह बॅलन्स (negative balance) नसेल. फास्टॅग खात्यात कमी रक्कम असली तरी टोलवरून जाता येईल.

First published:

Tags: Fastag, Nitin gadkari, Toll plaza