मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोठा निर्णय: 'आधार'प्रमाणे मतदान कार्डही होणार डिजिटल

मोठा निर्णय: 'आधार'प्रमाणे मतदान कार्डही होणार डिजिटल

Election Commission ने मोठा निर्णय घेतला आहे. मतदारांना आता मतदान कार्ड (Voting Card)  आधार कार्ड (Aadhar Card) प्रमाणे डिजिटल स्वरूपात (Digital Voter Card) ठेवता येणार आहे.

Election Commission ने मोठा निर्णय घेतला आहे. मतदारांना आता मतदान कार्ड (Voting Card) आधार कार्ड (Aadhar Card) प्रमाणे डिजिटल स्वरूपात (Digital Voter Card) ठेवता येणार आहे.

Election Commission ने मोठा निर्णय घेतला आहे. मतदारांना आता मतदान कार्ड (Voting Card) आधार कार्ड (Aadhar Card) प्रमाणे डिजिटल स्वरूपात (Digital Voter Card) ठेवता येणार आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : निवडणूक आयोग (Election Commission) लवकरच मतदान कार्ड डिजिटल स्वरुपात ( Digital Voter Cards)  घेऊन येण्याच्या तयारीत आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर मतदान कार्ड (Voting Card) आता आधार कार्ड प्रमाणे डिजिटल स्वरुपात ठेवता येणार आहे. त्याचबरोबर कागदी कार्ड देखील मतदारांना बाळगता येणार आहे. सध्याच्या मतदान कार्डधारकांना हेल्पलाइन अॅपच्या माध्यमातून केवायसी (KYC) केल्यानंतर ही सुविधा उपलब्ध होईल. मतदारांना 'इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड' (EPIC) ही सुविधा सहज उपलब्ध करून देणं, हे निवडणूक आयोगाचं उद्दीष्टं आहे.

निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर, नवीन मतदार इंटरनेटवरून आपलं मतदान कार्ड डाउनलोड करू शकतील. इतकंच नाही तर या डिजिटल कार्डच्या माध्यमातून ते त्यांचा मताधिकार बजावू शकणार आहेत. याशिवाय मतदान कार्ड मिळण्यासाठी होणारी दिरंगाई आणि त्यामुळे होणारा त्रासही कमी होणार आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या नोंदींमध्ये असलेल्या चालू मतदारांनाही याचा फायदा होणार आहे. या निर्णयानंतर मतदार डिजिटल स्वरूपात EPIC डाउनलोड करू शकणार आहेत.

परदेशी स्थलांतरित नागरीकांनाही फायदा होणार

आयोगाच्या निर्णयानंतर रेकॉर्डमध्ये नोंदणीकृत असलेले परदेशी मतदारदेखील डिजिटल मतदार कार्ड सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. परंतु, परदेशात राहणाऱ्या भारतीयांना मतदानाची सुविधा देण्यात आलेली नाही. निवडणूक आयोगाने याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. परदेशी भारतीयांनाही मतदान कार्ड दिले जात नाही. पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर परदेशी मतदारांनाही त्यांचे EPIC म्हणजेच डिजिटल मतदार कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

कार्डमध्ये दिलेल्या QR कोडच्या आधारे मतदान करता येईल

जर एखाद्या मतदाराचे मतदान कार्ड हरवले तर आणि त्यानं नवीन कार्डसाठी अर्ज केला असेल तर त्याला डिजिटल कार्ड डाउनलोड करता येऊ शकेल. पण त्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता मिळणं आवश्यक आहे. या प्रस्तावित डिजिटल मतदार कार्डमध्ये दोन क्यूआर कोड (QR) असतील. या कोडमधील माहितीच्या आधारे, इंटरनेटवरून डाउनलोड केलेल्या मतदान कार्डद्वारे मतदार मतदान करू शकतील. यामध्ये, क्यूआर कोडमध्ये मतदाराचे नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग आणि मतदारांच्या फोटोशी संबंधित माहिती असेल. त्याच वेळी दुसर्‍या क्यूआर कोडमध्ये मतदार यादीतील अनुक्रमांक वगळता मतदाराचा पत्ता असेल.

First published:

Tags: Aadhar card, Election commission