नवी दिल्ली 05 नोव्हेंबर: कोरोनाचा उद्रेक आणि हिवाळ्यामुळे वाढत असलेलं प्रदुषण यामुळे दिल्ली सरकारने दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाके विक्री करणे आणि खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात आज आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. (Ban on firecrackers on Diwali in Delhi)
या बंदीमुळे दिल्लीत दरवर्षी दिसणारी फटाक्यांची आतषबाजी आणि कानठळ्या बसवणारे आवाज ऐकू येणार नाही.
दिल्लीत हिवाळ्यामध्ये प्रदुषणात कमालीची वाढ होते. हवा दुषित झाल्याने श्वसनाचे आजार वाढतात. यावर्षी त्यात कोरोनाची भर पडल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यातच दिल्लीत कोरोनाचा वेग वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. दररोज 5 ते 6 हजारांच्या आसपास रुग्ण निघत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. या आधी अनेक राज्यांनी अशाच प्रकारचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातही फटाक्यांवर बंदीचा विचार राज्य सरकार करत आहे.
Delhi CM Arvind Kejriwal reviews #COVID19 situation with officials; says 'cases have increased due to festival season and pollution. It was decided to ban crackers in Delhi and ramp up medical infrastructure' among other measures. pic.twitter.com/DpkCoDYhpE
— ANI (@ANI) November 5, 2020
या आधी राजस्थान, ओरिसा, सिक्कीम या राज्यांनीही दिवाळीत फटाकेबंदीचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा प्रयत्न आहे. हिवाळ्यात आधीच प्रदुषणात वाढ होते. त्यात फटाक्यामुळे जास्त प्रदुषण होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने राज्य सरकार सावध झालं आहे.
दिवाळीनंतर थंडीत येणारी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून राज्य सरकारने या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे फटाके फोडण्यावर बंदी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे.
दिवाळीआधी लखपती बनण्याची सुवर्णसंधी! 'ही' नोट बनवेल तुम्हाला श्रीमंत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.
दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.