मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची चर्चा, काय आहे कारणं?

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची चर्चा, काय आहे कारणं?

काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदावरुन तीरथ सिंह रावत यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता दीदींना राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदावरुन तीरथ सिंह रावत यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता दीदींना राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदावरुन तीरथ सिंह रावत यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता दीदींना राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा सुरू आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

कलकत्ता, 7 जुलै : 5 दशकांपेक्षा जास्त काळानंतर बंगाल विधानसभेत टीएमसीद्वारा विधान परिषदेच्या गठनाचा प्रस्ताव पास झाला आहे. भाजपच्या सर्व आमदारांची याचा विरोध केला, मात्र 196 मतांनी हा प्रस्ताव पास झाला. आता प्रश्न असा आहे की, आपली सत्ता वाचवण्यासाठी सीएम ममता बॅनर्जी यांना या प्रस्तावाचा उपयोग होईल? सोशल मीडियावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदावरुन ममता बॅनर्जी यांना राजीनामा (Mamata Banerjee resigns) द्यावा लागणार, अशी चर्चा सुरू आहे.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्री (Uttarakhand Chief Minister resigns) पदावरुन तीरथ सिंह रावत यांना राजीनामा द्यावा लागला. तेदेखील उत्तराखंडमधील निवडणुकीत कोणत्याही मतदारसंघातून जिंकू शकले नाही. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममता बनर्जी (Mamata Banerjee) नंदीग्राम सीटमधून शुभेंदु अधिकारीच्या विरोधात 2000 पेक्षा कमी मतांनी पराभूत झाल्या होत्या. दुसरीकडे 6 महिन्यात कोरोना महासाथीच्या पोटनिवडणुकीच्या आयोजनात अनिश्चितता असल्यामुळे ममता आणि तृणमूल काँग्रेस चिंतेत आहे. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये सीएम पदावरून राजीनामा दिल्यानंतर टीएमसीसाठी चिंता वाढली आहे. यासाठी विधान परिषद केवळ ममता बँनर्जी यांच्यासाठी फायदेशीर ठरले, तर मुकुल रॉय सारख्या दुसऱ्या टीएमसी नेत्यांसाठीही उपयुक्त ठरेल. (Modi cabinet expansion)

हे ही वाचा-Big News : राजीनाम्याच्या चर्चेनंतर रावसाहेब दानवे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया

विधान परिषदेचा दावा

ममता बनर्जी यांनी आपल्या निवडणुकीतील (elections) यशानंतर 2011 मध्ये विधान परिषदेचं (Legislative Council) गठण करण्याचं वचन दिलं होतं. हे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर खूप दबाव होता. कारण हीच बाब टीएमसीच्या अन्य नेत्यांचं स्थान निश्चित करेल. अद्याप लोकसभा आणि राज्यसभेत हा प्रस्ताव पास होणं बाकी आहे. ज्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीनंतर विधान परिषदेचं गठण पूर्ण होईल. यापूर्वीही आसाम आणि राजस्थानमध्ये पाहण्यात आलं आहे की, विधान परिषदेचा प्रस्ताव राज्य विधानसभाजवळ असतानाही राज्यसभेत अडकला आहे. बंगालमध्ये प्रस्ताव राज्य विधानसभेत पास झाला आहे. भाजपचे 69 मतं या प्रस्तावाच्या विरोधात आहे. भाजपचं म्हणणं आहे की, हा टीएमसीचा मागील दारातील राजकारण करण्याची पद्धत आहे. ममतांसह ज्या नेत्यांना बंगाल निवडणुकीत अपयश मिळालं आहे, त्यांच्यासाठी जागा तयार करण्यासाठी हे राजकीय कारस्थान आहे.

 

First published:

Tags: Mamata banerjee, Modi government, Resigns