मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Big News : राजीनाम्याच्या चर्चेनंतर रावसाहेब दानवे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया

Big News : राजीनाम्याच्या चर्चेनंतर रावसाहेब दानवे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve resigned) आणि संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे वृत्त समोर आलं होतं.

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve resigned) आणि संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे वृत्त समोर आलं होतं.

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve resigned) आणि संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे वृत्त समोर आलं होतं.

नवी दिल्ली, 7 जुलै: केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet Expansion) आज विस्तार होणार आहे. जवळपास 20 ते 25 जणांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार आहे. दरम्यान राजीनाम्याचं सत्र सुरू झाले असून अनेक मोठ मोठ्या नेत्यांना डच्चू दिला गेला आहे. त्यात महाराष्ट्रातील नेते रावसाहेब दानवे यांचंही नाव असल्याची चर्चा सकाळपासून सुरू आहे. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve resigned) आणि संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अखेर रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पक्षातून कोणाचाही फोन आलेला नाही. मला राजीनामा देण्यासही सांगितले गेले नाही. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्यावरील संकट टळल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय दानवे दिल्लीला पोहोचल्याचंही त्यांनी सांगितलं. रावसाहेब दानवे यांचा दोनवेळा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता.

हे ही वाचा-इनकमिंगचा फायदा,दुसऱ्या पक्षांतून आलेल्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी संधी..!

आज सायंकाळी 6 वाजता मोंदीच्या मंत्रिमंडळाचा विस्ताव होणार आहे. दरम्यान राजीनामा सत्र सुरू झालं आहे. त्यात दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना मोठी संधी मिळाल्याची चर्चा आहे. कपिल पाटील, ज्योतिरादित्य शिंदे, भारती पवार, त्याशिवाय नारायण राणे यांची मोदींच्या मंत्रिमंडात वर्णी लागल्याची जोरदार चर्चा आहे. तर 8 -12 जणांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होणार आहे.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या या नेत्यांची चर्चा

Cabinet Expansion

1- Jyotiraditya Scindia

2 -Sarbananda Sonowal

3-Bhupender Yadav

4-Anurag Thakur

5-Meenakshi Lekhi

6-Anupriya Patel

7-Ajay Bhatt

8-Shobha karandjale

9-Sunita Dugga

10-Pritam Munde

11-Santanu Thakur

12-Narayan Rane

13-Kapil Patil

14-Pashupati Nath Paras (JDU)

15-RCP Singh (JDU)

16- G Krishan reddy

17- Parshottam Rupala

18- Ashwini vaishnav

19 - Bharati Pawar

20 - Bhagwat Karad

First published:
top videos

    Tags: BJP, Narendra modi, Raosaheb danave, Union cabinet