मराठी बातम्या /बातम्या /देश /

घरातील या वस्तूंची खरेदी केली का? नव्या वर्षात किमतीत होणार मोठी वाढ

घरातील या वस्तूंची खरेदी केली का? नव्या वर्षात किमतीत होणार मोठी वाढ

तांबे. अॅल्युमिनियम सारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत आणि हवाई तसेच जलमार्ग वाहतूक शुल्कात वाढ झाल्याने ही दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तांबे. अॅल्युमिनियम सारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत आणि हवाई तसेच जलमार्ग वाहतूक शुल्कात वाढ झाल्याने ही दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तांबे. अॅल्युमिनियम सारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत आणि हवाई तसेच जलमार्ग वाहतूक शुल्कात वाढ झाल्याने ही दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 1 जानेवारी : एलईडी टीव्हीसह फ्रिज, वॉशिंग मशीनसारख्या होम अॅप्लायन्सेसच्या (Home Appliances) किंमतीत नव्या वर्षात सुमारे 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तांबे. अॅल्युमिनियम सारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत आणि हवाई तसेच जलमार्ग वाहतूक शुल्कात वाढ झाल्याने ही दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी पुरवठयामुळे जगभरातील विक्रेत्यांनी टीव्ही पॅनेल्स (ओपनसेल) दोन पटींनी वाढवल्या आहेत. तसेच क्रुड ऑइलच्या (Crude Oil) किंमती वाढल्याने प्लास्टीकच्या किंमतीतही वाढ झाली आहे. दरवाढ अपरिहार्य आणि गरजेची असल्याचे नमूद करीत एलजी, (LG) पॅनेसानिक (Panasonic) आणि थॉमसनसारख्या (Thomson) कंपन्या जानेवारीपासून उत्पादनांच्या किंमतीत वाढ करणार आहेत तर सोनी कंपनी परिस्थितीचा आढावा घेऊन दरवाढीबाबत भाष्य करणार आहे. हे वाचा-FD काढायचा विचार करताय? तपासा या टॉप 5 बँका किती व्याजदर देत आहेत पॅनेसॉनिक इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शर्मा म्हणाले, की कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने नजीकच्या काळात आमच्या उत्पादनांच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो. जानेवारीमध्ये 6 ते 7 टक्क्यांनी किमती वाढतील आणि अर्थिक वर्षा समाप्तीपर्यंत त्या 10 ते 11 टक्क्यांपर्यंत वाढू शकतील. एलजी इलेक्ट्रॉनिक इंडिया (LG Electronic India) देखील पुढीलवर्षी 1 जानेवारीपासून उपकरण श्रेणीतील उत्पादनांच्या किमतीत 7 ते 8 टक्क्यांनी वाढ करणार आहे. याबाबत एलजी इलेक्ट्रॉनिक इंडिया व्हीपी – होम अॅप्लायन्सेसचे विजय बाबू म्हणाले, की जानेवारीपासून आम्ही टीव्ही, वाशिंग मशीन, रेफ्रिजीरेटर आदी सर्व उत्पादनांच्या किंमतीत 7 ते 8 टक्क्यांनी वाढ करीत आहोत. कच्च्या मालाच्या  तसेच तांबे, अल्युमिनीयम या धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच क्रुड ऑईलच्या दरात वाढ झाल्याने प्लॅस्टिकचे दर वाढले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाचा-नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी! कामाचे तास आठच राहण्याची शक्यता- अहवाल सोनी इंडिया (Sony India) अजूनही दरवाढीबाबत वेट अँड वॉच या भूमिकेत आहे. यावर अंतिम निर्णय घेण्याची अद्याप गरज नसली तरी त्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे संकेत कंपनीने दिले आहेत. किंमतीबाबत विचारले असता, सोनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील नय्यर म्हणाले, की अद्याप नाही. सध्या वेट अँड वॉच सुरु आहे. आम्ही दिवसेंदिवस बदलत जाण्याऱ्या पुरवठ्याच्या बाजूने पाहत आहोत. सध्याची परिस्थिती अस्पष्ट आहे. या स्थितीतून आम्ही किती काळ वाटचाल करु याबाबत अंदाज नाही. टिव्ही पॅनेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. तसेच अन्य कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्या आहेत. आम्ही मागणी आणि पुरवठ्याचा प्रामुख्याने विचार करतो. वर्क फ्राॅम होममुळे उत्पादनांना मागणी वाढलीय. कारखाने पुर्ण क्षमतेने सुरु नसल्याने पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे पुरवठा क्षेत्रात पोकळी निर्माण होऊन किंमती वाढल्याचे नय्यर यांनी सांगितले. पुरवठ्यात अडथळा, मागणीत वाढ आणि अन्य समस्यांमुळे वादळी स्थिती तयारी झाली होती. छोट्या स्क्रिनच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे उद्योगापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या स्क्रिनबाबतही समस्या आहे पण त्या फार मोठ्या प्रमाणात आहेत असे मला वाटत नाही. 32 इंच स्क्रिनलाच अजून भारतीय बाजारात मोठी मागणी असल्याचे नय्यर यांनी सांगितले. फ्रेंच इलेक्ट्रानिक्स ब्रॅण्ड थॅामसन (Thomson) आणि कोडॅकचा (Kodak) ब्रॅण्ड परवानाधारक सुपर प्लॅस्टीकॉन यांनी म्हटले आहे की बाजारात टीव्ही ओपनसेलची कमतरता आहे आणि त्याच्या किंमतीत जवळपास 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पॅनेलच्या किमतीत 200 टक्क्यांनी वाढ झाली असून पुरवठा कमी आहे.जागतिक पातळीवर पॅनेल निर्मिताला पर्याय नसल्याने आपण चीनवर अवलंबून आहोत. थॉमसन आणि कोडॅक अँड्राइड टीव्हीच्या किमतीत जानेवारीपासून 20 टक्क्यांनी वाढ होईल, असे एसपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अवनीतसिंह मारवाह यांनी सांगितले. आक्टोबर 2020 च्या तुलनेत इम्पोर्ट फ्रेट शुल्कात तीन पट वाढ झाली असल्याने किमतीत वाढ होत असल्याचे व्हिडीओटेक्स इंटरनॅशनलचे संचालक अर्जुन बजाज यांनी सांगितले. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड अॅप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (सीईएएमए) यांनी पुढील तिमाहीत ब्रॅंण्डसने केलेली दरवाढ एकूणच मागणीला अडथळा ठरु शकते असा इशारा दिला आहे. कच्च्या मालाच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी झालेली वाढ, कंटेनरच्या कमतरतेमुळे जल आणि हवाई वाहतूक शुल्कात 6 ते 7 पटींनी वाढ, कोरोनामुळे खाणकामातील अडचणींचा दबाव उत्पादनांच्या इनपूट किंमतीवर पडत आहे. परिणामी ब्रॅंण्डसच्या किंमतीत 8 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पुढील तिमाहीत मागणीत अडथळा निर्माण होऊ शकतो, असे सीईएएमचे अध्यक्ष आणि गोदरेज अॅप्लायन्सेसचे बिझनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमाल नंदी यांनी सांगितले. नय्यर यांच्या म्हणण्यानुसार, ही स्थिती दिर्घकाळ टिकणारी नाही. परंतु, पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत उद्योगांसाठी दबाव कायम राहिल. भारतीय उपकरणे आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक उद्योग हा प्रामुख्याने काही घटकांच्या आयातीसाठी चीनवर अवलंबून आहे. सीईएएमए आणि फ्रास्ट अण्ड सुविलियनच्या संयुक्त अहवालानुसार,  2019-20मध्ये या उद्योगांची एकूण बाजारपेठ 76,400 कोटींची होती.त्यात देशातंर्गत उत्पादनांचा वाटा 2200 कोटींचा होता.
First published:

Tags: Happy New Year 2021

पुढील बातम्या