जाहिरात
मराठी बातम्या / देश / घराच्या वास्तूशांतीसाठी मिळाली नाही सुट्टी, उपजिल्हाधिकारी महिलेनं दिला राजीनामा

घराच्या वास्तूशांतीसाठी मिळाली नाही सुट्टी, उपजिल्हाधिकारी महिलेनं दिला राजीनामा

निशा बांगरे

निशा बांगरे

सुट्टीसाठी चक्क उप जिल्ह्याधिकारी असलेल्या निशा बांगरे यांनी मोठं पाऊल उचललं आहे. सुट्टीचा अर्ज स्वीकारला नाही म्हणून त्यांना थेट राजीनामा दिला आहे.

  • -MIN READ Madhya Pradesh
  • Last Updated :

भोपाळ : कामाच्या ठिकाणी बऱ्याचवेळी ब्रेक घ्यावा या विचाराने सुट्टी घेतली जाते. कामाचा ताण जास्त असेल तर मात्र सुट्टी नाकारली जाते. सुट्टी दिली जात नाही किंवा बऱ्याचदा पुढे घ्या असं सांगितलं जातं. आता याच सुट्टीसाठी चक्क उप जिल्ह्याधिकारी असलेल्या निशा बांगरे यांनी मोठं पाऊल उचललं आहे. सुट्टीचा अर्ज स्वीकारला नाही म्हणून त्यांना थेट राजीनामा दिला आहे. राज्य प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि छतरपूरच्या उप जिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बांगरे यांनी प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभागाला लिहिलेल्या पत्रात नव्या घराच्या गृहप्रवेशासाठी उपस्थित राहू न दिल्याने दु:ख झालं असं म्हटलं आहे. 25 जून रोजी बैतूलच्या आमला इथे त्यांच्या नव्या घराचा गृहप्रवेश होता. आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांतता परिषदही आयोजित केली जाणार आहे. बांगरे महिलांना यासाठी प्रेरित करत आहेत. या कार्यक्रमालाही रजा न मिळाल्याने बांगरे संतप्त झाल्या. त्यांनी याला धार्मिक भावना दुखावणे म्हणत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

BJP MP : स्वतःचं घर आणि मुलाच्या लग्नावर उडवला खासदार निधी; भाजप खासदाराच्या व्हिडीओने खळबळ

विभागाने मला घराच्या गृहप्रवेशासाठीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ दिले नाही, असे निशा बांगरे यांनी पत्रात म्हटलं आहे. याबद्दल मी दु:खी आहे. धार्मिक कार्यक्रमात जागतिक शांतता दूत आणि बुद्धांच्या अस्थींचे दर्शन घेण्यास विभागाने परवानगी दिली नाही.

News18लोकमत
News18लोकमत

यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझे मुलभूत हक्क, धार्मिक श्रद्धा आणि घटनात्मक मूल्यांशी तडजोड करून उपजिल्हाधिकारी पदावर राहणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे 22 जून रोजी मी माझ्या उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देत आहे. राज्य सरकारच्या या पत्रानंतर निशा बांगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रत्यक्षात बालाघाटमध्ये जन्मलेल्या 2016 च्या बॅचच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे या राजकारणात जाऊ शकतात, अशीही एक चर्चा रंगली आहे. गेल्या वर्षभरापासून आमला विधानसभेत सक्रिय आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आलं आहे. त्या आगामी निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात