हैदराबाद, 20 जून : आमदार किंवा खासदार यांना आपल्या मतदारसंघात जनतेची कामे करण्यासाठी निधी दिला जातो. मात्र, एका भाजप खासदारने हा निधी आपल्या वैयक्तीक कामासाठी वापरल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तेलंगणाचे भाजप खासदार सोयाम बापूराव यांचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर ते वादात सापडले आहेत. सोयम बापूराव यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात उघडपणे याची कबुली दिली आहे. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेचा निधी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी न वापरता त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचे बोलताना व्हिडीओत दिसत आहे.
“I used my MPLADS funds to construct a home & to get my son married” - #BJP MP from Adilabad, Telangana #SoyamBapuRao
— Putta Vishnuvardhan Reddy (@PuttaVishnuVR) June 20, 2023
Desh keliye, Dharm keliye Shaayad ! pic.twitter.com/yHyUonR9Hk
1993 मध्ये सुरू करण्यात आलेली खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना, खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील विशिष्ट गरजांवर आधारित स्थानिक विकास प्रकल्पांसाठी निधी वाटप करते. व्हायरल व्हिडिओमध्ये, राव यांना असे म्हणताना ऐकू येते की त्यांनी मिळालेल्या पैशांचा एक भाग महापालिका पोलीस प्रशिक्षण समिती (एमपीटीसी) आणि परिसरातील नगरसेवकांना वाटला. वाचा - इच्छुकांचे देव पाण्यात, पण विठोबा पावणार का? मंत्रिमंडळ विस्ताराला वेग, नवा मुहूर्त आला? घर बांधण्यासाठी पैसे वापरले खासदार म्हणाले, ‘दुसऱ्यांदा अडीच कोटी रुपये आले. आम्ही एमपीटीसी आणि या भागातील नगरसेवकांना काही रक्कम दिली. मतदारसंघात माझे घर नसल्याने त्यातील काही रक्कम मी घर बांधण्यासाठी वापरली. दुसरा कोणताही नेता ते मान्य करणार नाही, पण मी ते स्वीकारत आहे. आपल्या मुलाच्या लग्नासाठी खासदार निधीतून पैसे खर्च केल्याचेही त्यांनी मान्य केले. आंदोलक खासदारांना दिला सल्ला ते म्हणाले की, यापूर्वी अनेक खासदारांनी त्यांच्या कामांसाठी संपूर्ण निधी वापरला. आज आमच्या पक्षाचे काही नेते माझ्यावर टीका करत आहेत, पण माझ्या आधी या जनतेचा पैसा इतरांनी कसा वापरला, हे त्यांच्या लक्षात येत नाही.