मराठी बातम्या /बातम्या /देश /Omicron आणि Delta पासून तयार झालेला कोरोना मिश्र विषाणू वाढवणार चिंता; शास्त्रज्ञांचा इशारा

Omicron आणि Delta पासून तयार झालेला कोरोना मिश्र विषाणू वाढवणार चिंता; शास्त्रज्ञांचा इशारा

अनेक अभ्यासांमध्ये Omicron + Delta recombinant virus चे ठोस पुरावे सापडले आहेत. यानंतर अशा मिश्रित विषाणूचे मूळ समजणं कठीण आहे, असं एका प्रतिष्ठित भारतीय तज्ज्ञानं सांगितलं आहे.

अनेक अभ्यासांमध्ये Omicron + Delta recombinant virus चे ठोस पुरावे सापडले आहेत. यानंतर अशा मिश्रित विषाणूचे मूळ समजणं कठीण आहे, असं एका प्रतिष्ठित भारतीय तज्ज्ञानं सांगितलं आहे.

अनेक अभ्यासांमध्ये Omicron + Delta recombinant virus चे ठोस पुरावे सापडले आहेत. यानंतर अशा मिश्रित विषाणूचे मूळ समजणं कठीण आहे, असं एका प्रतिष्ठित भारतीय तज्ज्ञानं सांगितलं आहे.

    नवी दिल्ली 14 मार्च : देशासह जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने हाहाकार माजवला होता. त्यानंतर ओमायक्रॉन नावाचा एक नवा प्रकार आला. या व्हेरियंटमुळे अनेक देशांमध्ये रुग्ण वेगाने वाढले होते. मात्र, भारतात ओमायक्रॉनचा तेवढा प्रभाव दिसून आला नव्हता. यातच आता अनेक अभ्यासांमध्ये Omicron + Delta recombinant virus चे ठोस पुरावे सापडले आहेत. यानंतर अशा मिश्रित विषाणूचे मूळ समजणं कठीण आहे, असं एका प्रतिष्ठित भारतीय तज्ज्ञानं सांगितलं आहे. अशा विषाणूंचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करणं आवश्यक आहे, अशी गरज त्यांनी बोलून दाखवली.

    दुसरीकडे ओमिक्रॉन (Omicron) आणि डेल्टा (Delta) वेगाने पसरत आहेत, त्यामुळे रीकॉम्बिनंट व्हायरस (Recombinant virus) आढळणं शक्य आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आधीच जाहीर केलंय.

    भारतात कोरोनामुळे झालेले मृत्यू सरकारी आकडेवारीपेक्षा 8 पट जास्त? अहवालात दावा

    मिश्र विषाणूमुळे उद्भवू शकतात समस्या – तज्ज्ञ

    डॉ. राकेश मिश्रा, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स अँड सोसायटी (टीआयजीएस), बेंगळुरू, यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितलं की, “जरी मिश्र विषाणू आला नाही तरीही ओमायक्रॉनमध्ये भरपूर क्षमता आहे. तसंच जर त्याच्यात काही बदल झाला तर त्यातून मोठी अडचण उद्भवू शकते. डेल्टा व्हेरियंट (delta variant) आधीच निघून गेला आहे आणि सध्या बहुतेक ठिकाणी ओमायक्रॉन (Omicron) आहे. यामुळे या दोघांचा मिळून नवीन विषाणू तयार होण्याची शक्यता कमी होते, असंही ते म्हणाले.

    व्हायरसमध्ये सतत बदल होणं ही एक मोठी समस्या

    “प्रत्येकाला मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याचं कारण म्हणजे ओमायक्रॉन. ओमायक्रॉन जवळपास 99 टक्के ठिकाणी आहे, त्यामुळे डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हायरस एकत्र होणं ही समस्या नाही, परंतु व्हायरसमध्ये सतत बदल होणं ही एक मोठी समस्या आहे,” असं मिश्रा म्हणाले.

    Explainer: भारताने चुकून डागलं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र; नेमकी काय आणि कसं घडलं?

    नवा मिश्र व्हायरस काय आहे?

    एका नवीन अभ्यासात दावा करण्यात आला आहे की डेल्टा आणि ओमायक्रॉन एकत्र येऊन नवीन विषाणू तयार करू शकतात आणि शास्त्रज्ञांना याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. अलीकडील संशोधनात, फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ मेडिटेरेनियन इन्फेक्शनचे फिलिप कोल्सन आणि त्यांच्या टीमला डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संयोगाने तयार झालेल्या विषाणूबद्दल ठोस पुरावे मिळाले आहेत.

    WHO ने व्यक्त केली चिंता

    जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या अभ्यासाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे दोन्ही प्रकार वेगाने पसरत होते आणि त्यामुळे यांचं एकत्र येणं आणि त्यातून नवीन विषाणूचा प्रकार तयार होणं हे अपेक्षित होतं. या नव्या विषाणूची तीव्रता आणि त्याच्या प्रसाराची शक्यता समजून घेण्यासाठी अनेक अभ्यास सुरू आहेत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Delta virus, Omicron, Who