Home /News /national /

Explainer: भारताने चुकून डागलं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र; नेमकी काय आणि कसं घडलं?

Explainer: भारताने चुकून डागलं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र; नेमकी काय आणि कसं घडलं?

भारताच्या संरक्षण मंत्रालयाने (Defense ministry) हे कोणतं क्षेपणास्त्र होतं याबाबत काहीही खुलासा केलेला नाही. हे ब्राह्मोस (Brahmos) क्षेपणास्त्र असावं अशी चर्चा आहे. कसं काम करतं Brahmos? नेमकं काय झालं बॉर्डरजवळ?

    दिल्ली, 12 मार्च: भारतीय हद्दीतून (Indian Territory) डागलं गेलेलं एक क्षेपणास्त्र (India accidentally fires Missile into Pakistan) थेट पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीत घुसल्याची घटना नुकतीच घडली आहे. तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडल्याचं भारत सरकारने म्हटलं आहे. नऊ मार्च रोजी संध्याकाळी दैनंदिन देखभालीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हे क्षेपणास्त्र उडालं आणि अचानक त्याने दिशा बदलून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला. या प्रकरणाची भारत सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली असून, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. 'फर्स्ट पोस्ट'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. नेमकं काय घडलं? नऊ मार्च रोजी पाकिस्तानच्या सैन्याच्या जनसंपर्क खात्याचे महासचिव मेजर जनरल इफ्तिकार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, की संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास भारतीय हद्दीतून एक अतिवेगवान उपकरण पाकिस्तानच्या हद्दीत आल्याचं पाकिस्तानी हवाई दलाच्या (Pakistan Air Force) निदर्शनास आलं आहे. खनेवाल जिल्ह्यातल्या मियान चुन्नू (Mian Channu) भागात हे क्षेपणास्त्र कोसळलं असून, पाकिस्तानच्या हवाई हद्दीवर त्यानं आक्रमण केलं आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं हे सुपरसॉनिक (Supersonic) क्षेपणास्त्र असल्याचं स्पष्ट झाल्याचंही पाकिस्ताननं म्हटलं आहे. हरयाणातल्या सिरसा (Sirsa) येथून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं आणि त्याचं लक्ष्य राजस्थानमधलं महाजन फायरिंग फिल्ड हे होतं, असाही दावा करण्यात आला आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने हे कोणते क्षेपणास्त्र होतं याबाबत काहीही खुलासा केलेला नाही. हे ब्राह्मोस (Brahmos) क्षेपणास्त्र असावं अशी चर्चा आहे. पाकिस्तानी लष्करानं केलेल्या वर्णनानुसार हा अंदाज वर्तवला जात आहे. ध्वनिहून अधिक वेगाने म्हणजे 3 माख वेगाने हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत 100 किलोमीटरपेक्षा जास्त आतापर्यंत आल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. ब्राह्मोस हे जगातल्या वेगवान क्षेपणास्त्रांपैकी एक असून, त्याचा कमाल वेग 4 माख असून ते 290 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. सिरसा ते मियान चुन्नू हे अंतर 277 किलोमीटर आहे. मोठी बातमी! काश्मीर खोऱ्यातील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा तर एकाला अटक 2017मध्ये भारतानं ब्राह्मोसची यशस्वी हवाई चाचणी घेतली होती. त्यानंतर अनेकदा त्याच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. रशियाच्या सहकार्याने भारतानं ब्राह्मोस हे मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र विकसित केलं असून, ते जमिनीवरून, विमानातून, जहाजातून आणि पाणबुडीतूनही डागता येतं. ब्राह्मोसच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र 'फायर अँड फरगॉट' या तत्त्वावर चालते. याचा अर्थ या क्षेपणास्त्राचा मार्ग हा त्याच्या प्रक्षेपणाच्या वेळी निर्धारित केलेल्या लक्ष्यावर अवलंबून असतो. विशेष म्हणजे ब्राह्मोस अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी सक्षम आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलही ब्राह्मोसने सुसज्ज आहेत. 2017मध्ये भारतानं आपण किती ब्राह्मोस क्षेपणास्त्रं तैनात केली आहेत, याचा आकडा जाहीर करण्यास नकार दिला होता. या क्षेपणास्त्रामध्ये पाच घटक असतात. लक्ष्य, मार्गदर्शन प्रणाली, उड्डाण प्रणाली, इंजिन आणि वॉरहेड. जमिनीवरून, जहाजावरून आणि विमानांमधूनही ते उडवलं जाऊ शकतं. ते जमिनीवरून जमिनीवर आणि हवेतून जमिनीवर मारा करू शकतं. ज्यावेळी त्याला वॉरहेड नसतं, त्या वेळी ते चाचणीसाठी उडवलं जात असल्याचं स्पष्ट होतं. 50 प्रवाशांचं विमान रनवेवरच घसरलं; पायलटच्या प्रसंगावधानाने बचावले प्रवाशी हवाई क्षेत्राचं विनाकारण उल्लंघन केल्याबद्दल भारताचा निषेध नोंदवण्यासाठी इस्लामाबादमधल्या भारताच्या अधिकाऱ्यांना पाकिस्तानने नोटीस पाठवली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने या घटनेची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. 1997मध्ये, भारतीय हवाई दलाच्या मिग-25 जेटने एका मोहिमेवर असताना चुकून पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश केला होता. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, एका विमानाने चुकून एकदा इस्लामाबादवर एक शक्तिशाली सोनिक बूम पाठवला होता.
    First published:

    Tags: Missile, Pakistan

    पुढील बातम्या