सूनेने सासरच्या 6 जणांना सायनाइड देऊन मारले, तुरुंगात केला आत्महत्येचा प्रयत्न

सूनेने सासरच्या 6 जणांना सायनाइड देऊन मारले, तुरुंगात केला आत्महत्येचा प्रयत्न

सूसेने एक एक करीत सासरच्या सहा जणांची हत्या केली होती

  • Share this:

कोझिकोड, 27 फेब्रुवारी : केरळमधील कोझिकोड येथे सायनाइड (Cynide Murder) देऊन आपल्या सासरच्या 6 सदस्यांची हत्या करणाऱ्या आरोपी महिलेने तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोझिकोड तुरुंगात असलेल्या आरोपी जॉलीने आपल्या हाताची नस कापली आहे. गंभीर अवस्थेत तिला मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आता तिची प्रकृती स्थिर आहे. घरातील सर्व सदस्यांची हत्या एकाच पद्धतीने करण्यात आली होती. सर्वांच्या अन्नात सायनाइड मिसळून मारण्यात आले होते. वेगवेगळ्या वेळेत झालेल्या या हत्यांना घरातील व शेजारच्यांही नैसर्गिक मृत्यू मानला होता. मात्र एका पुराव्यातून पोलिसांनी जॉलीवर संशय आला. ज्यानंतर तिला अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान तिने आपण केलेल्या हत्यांची कबुली दिली.

काय आहे संपूर्ण प्रकरण

ही घटना कोझिकोड येथील कुथडई गावातील आहे. या गावातील राहणारी रॉय थॉमस यांचे लग्न जॉलीसोबत झाले होते. घरात रॉय थॉमस आणि जॉली यांव्यतिरिक्त रॉय थॉमसचे वडील टॉम जोस, आऊ अनम्मा थॉमस, अनम्माचे भाऊ मैथ्यू मंजाडिज, टॉम जोसचे भाऊ जचारियांचा मुलगा शाजू, त्यांची पत्नी सिली आणि दोन वर्षांची मुलगी अल्फाइन राहत होते. 2002 मध्ये 57 वर्षांची अनम्मा थॉमस यांचा मृत्यू झाला. घरातील सदस्यांना हा नैसर्गिक मृत्यू वाटला. त्यानंतर 2008 मध्ये अनम्माचे पती टॉम जोस यांची ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यालाही सदस्यांनी नैसर्गिक मृत्यू मानला गेला. मात्र 2011 मध्ये टॉम आणि अनम्मा यांचा मुलगा रॉय थॉमसचाही मृत्यू झाला. रॉय थॉमस याच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण सायनाइड असल्याचे समोर आले. पोलिसांनी याला आत्महत्या असल्याचे सांगितले. 2014 मध्ये अनम्माचा भाऊ मैथ्यू आणि याच वर्षी शाजू, सिली यांची दोन वर्षांची मुलगी अल्फोंसा यांचा मृत्यू झाला. 2016 मध्ये सिलीचाही मृत्यू झाला. जॉलीवर गेल्या 14 वर्षांपूर्वी आपला पती, सासू, सासऱ्यांसह एकूण सहा लोकांची हत्या करण्याचा आरोप आहे. ज्यामध्ये दोन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.

हेही वाचा - प्रशांत किशोरवर पॉलिटिकल कॅम्पेनची नक्कल केल्याचा आरोप, पोलिसात तक्रार

हत्येमागे संपत्तीचे कारण?

या हत्येमागे संपत्तीचे कारण असल्याचे टॉम थॉमस यांचा मुलगा रोजो याने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crimekeral
First Published: Feb 27, 2020 11:54 AM IST

ताज्या बातम्या