Home /News /national /

Delhi Red Fort : लाल किल्ला अनिश्चित कालावधीसाठी बंद

Delhi Red Fort : लाल किल्ला अनिश्चित कालावधीसाठी बंद

दिल्लीचा लाल किल्ला (Red Fort) आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर (Tractor Rally) चांगलाच चर्चेत आला आहे. अशात हा लाल किल्ला अनिश्चित कालावधीसाठी बंद (Red Fort Close) केला गेला आहे.

    नवी दिल्ली 2 फेब्रुवारी : दिल्लीचा लाल किल्ला (Red Fort) आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर (Tractor Rally) चांगलाच चर्चेत आला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवल्यानं सर्वत्र याबाबत चर्चा सुरू आहे. अशात आता या लाल किल्ल्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील लाल किल्ला अनिश्चित कालावधीसाठी बंद (Red Fort Close) केला गेला आहे. मध्य दिल्लीच्या डीएमनं याबाबतचे आदेश दिले आहेत. दिल्ली आपत्ती प्राधिकरणानं जारी केलेल्या आदेशामध्ये सांगितलं, की लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरातील बर्ड फ्लूच्या (Bird Flu) संसर्गाचा धोका लक्षात घेता हे ठिकाण सामान्य जनता आणि पर्यकांसाठी बंद केलं गेलं आहे. याआधी लाल किल्ल्याच्या परिसरात 14 कावळे आणि 4 बदकांचा मृत्यू झाला होता. यानंतर तपासणीदरम्यान त्यांना बर्ड फ्लू झाल्याचं आढळून आलं होतं. 8 पक्षांमध्ये बर्ड फ्लू आढळून आल्यानंतर अॅनिमल हजबंडरी विभागनं दिल्लीमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची माहिती दिली होती. प्रोसेस्ड चिकनवर बंदी - यानंतर दिल्लीच्या अनेक बाजारांमध्ये आणि छोट्या दुकानांमध्ये प्रोसेस्ड आणि कच्च्या चिकनच्या विक्रीला बंदी घालण्यात आली होती. विक्रीसोबतच कोंबड्या साठवून ठेवण्यावरही बंदी होती. दिल्ली सरकारनं याबद्दल आदेश दिले होते. महाराष्ट्रातही झालाय बर्ड फ्लूचा शिरकाव - राज्यातही परभणी, मुंबई, पुणे आणि ठाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. यामुळे पोल्ट्री उद्योगाला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. याआधी कोरोना काळात उठलेल्या अफवांमुळे पोल्ट्री व्यावसाय मेटाकुटीला आला होता. या धक्क्यातून सावरत असतानाच आता बर्ड फ्लूचं संकट समोर उभं ठाकल्यानं पोल्ट्री व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bird flu, Farmer protest, Red fort delhi

    पुढील बातम्या