मराठी बातम्या /बातम्या /देश /

Alert जारी! 15 वर्षांपासून मौलाना बनून खुलेआम देशात होता पाकिस्तानी दहशतवादी, पोलिसांनी उधळला 'लोन वुल्फ अटॅक' चा प्लॅन

Alert जारी! 15 वर्षांपासून मौलाना बनून खुलेआम देशात होता पाकिस्तानी दहशतवादी, पोलिसांनी उधळला 'लोन वुल्फ अटॅक' चा प्लॅन

भारतातील वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या आणि दिल्लीत मोठा दहशतवादी (Delhi Police arrested Pakistani terrorist) हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली पोलिसानी अटक केली आहे.

    नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : भारतातील वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या आणि दिल्लीत मोठा दहशतवादी (Delhi Police arrested Pakistani terrorist) हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सणासुदीच्या काळात दिल्ली आणि जम्मू काश्मीरमध्ये (Plan of terror attack in Delhi and J&K) दहशतवादी हल्ला करण्याचा त्याचा इरादा यामुळे फसला आहे. मात्र गेल्या 15 वर्षांपासून हा पाकिस्तानी (Terrorist was living in India since 15 years) दहशतवादी भारतात कसा राहू शकला, याचं उत्तर जेव्हा पोलिसाना मिळालं, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. बिहारमधून बनवलं बोगस ओळखपत्र दिल्लीतून अटक करण्यात आलेला कुख्यात दहशतवादी अशरफ अली हा बिहारचा रहिवासी असल्याची बतावणी करत होता. त्याच्याकडे बिहारचा रहिवासी असल्याचं ओळखपत्रही होतं. शिवाय दिल्लीचा रहिवासी असल्याचं आणखी एक बोगस ओळखपत्रही त्यानं बनवून घेतलं होतं. दिल्लीत झालेल्या या गौप्यस्फोटानंतर बिहार पोलिसांनाही धक्का बसला असून आपल्या राज्यात पाकिस्तानी दहशतवाद्याला ओळखपत्र कसं मिळालं, याचा तपास ते करत आहेत. मोठ्या हल्ल्याचा कट बिहारमध्ये मौलाना म्हणून राहणारा अशरफ अली काही महिन्यांपूर्वी दिल्लीत राहायला आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत त्याचं दूरवर नेटवर्क पसरलं असून तिथल्या स्लीपर सेलचा प्रमुख म्हणूनही तो काम पाहत होता. कालिंदी कुंज परिसरात वाळूच्या ढिगाऱ्याखाली त्याने अनेक शस्त्रास्त्रं लपवून ठेवली होती. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं दिलेल्या माहितीनुसार तो लवकर 'लोन वुल्फ अटॅक' करण्याच्या तयारीत होता. अशरफ अलीच्या चौकशीतून पोलिसांना इतरही अनेक धागेदोरे मिळाले असून लवकरच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हे वाचा - 'महागाई वाढलीये तर कमी खा'; पाकिस्तानी मंत्र्याचा अजब सल्ला, जनता शॉक काय असतो 'लोन वुल्फ अटॅक'? एखादा दहशतवादी जेव्हा एखाद्या परप्रांतात एकट्याने हल्ला करण्याची योजना आखतो, त्याला 'लोन वुल्फ अटॅक' असं म्हणतात. दहशतवादी छोट्या शस्त्रांचा वापर करून अधिकाधिक नागरिकांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या हल्ल्यांना दहशतवादी संघटना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. या हल्ल्यांमुळे दहशतवादी संघटनांसाठी जास्तीत जास्त एकाच व्यक्तीची जीवितहानी होत असते आणि अधिकाधिक माणसं मारली जाण्याची शक्यता असते.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bomb Blast, Delhi, Terror acttack, Terrorists

    पुढील बातम्या