मराठी बातम्या /बातम्या /देश /लाल किल्ला तुमच्या मालकीचा, मग याचिकेसाठी 150 वर्षे का लावली? दिल्ली हायकोर्टाचा मुघल वंशजांना सवाल

लाल किल्ला तुमच्या मालकीचा, मग याचिकेसाठी 150 वर्षे का लावली? दिल्ली हायकोर्टाचा मुघल वंशजांना सवाल

Red Fort

Red Fort

लाल किल्ला (Red Fort) आपल्या मालकीचा असल्याचा दावा मुघलांची वंशज असलेल्या सुलताना बेगम यांनी केला आहे.

नवी दिल्ली, 21 डिसेंबर: लाल किल्ला (Red Fort) आपल्या मालकीचा असल्याचा दावा मुघलांची वंशज असलेल्या सुलताना बेगम यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच (Delhi High Court) याचिका दाखल केली होती. मात्र, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला हक्क सागणाऱ्या या मुघल वंशी (Mughal)महिलेला दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले. तुम्ही दीडशे वर्षे काय करत होता? असा सवाल उच्च न्यायालयाने दावा ठोकणाऱ्या महिलेला केला आहे.

नवी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर (Red Fort) आपला अधिकार असल्याचा दावा शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर (Bahadur Shah Zafar) यांच्या वंशज असलेल्या सुलताना बेगम नावाच्या महिलेने केला आहे. दाखल केलेल्या याचिकेमध्ये 'लाल किल्ल्यावर आपला अधिकार असून 1857 साली ब्रिटिशांनी त्यावर जबरदस्तीने कब्जा केला आहे.' असे म्हटले आहे. तसेच, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना त्यांच्या मालमत्तेपासून वंचित ठेवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.

आता लाल किल्ल्याचा ताबा घेण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेबाबत बहादूर शाह जफरच्या वंशजांना कोर्टात जाण्यासाठी 150 वर्षे कशी लागली? असा सवाल न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी केला. तसेच, सुलताना बेगमच्या पूर्वजानंनी या आधी लाल किल्ल्यावर आपला हक्क असल्याचा दावा कधीही केला नाही. मग आता न्यायालय या प्रकरणात काही करु शकत नाही. असे सांगता करण्यात आलेल्या याचिकेला फटकारण्यात आले.

यासोबतच रेखा पल्ली म्हणाल्या की, त्यांचे इतिहासाचे ज्ञान फारच कमकुवत आहे, परंतु 1857 मधील अन्यायाविषयी इतकी वर्षे गप्प का होता? याचबरोबर, याचिकाकर्ते बहादूर शाह जफरचे वंशज असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही कागदपत्र नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाला आढळून आले. याबाबतही दिल्ली हायकोर्टाने टिपण्णी केली.

सुलतानाच्या याचिकेत काय म्हटले आहे?

सुलताना बेगम यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, 1857 मध्ये त्यांच्या पूर्वजांनी अडीचशे एकरमध्ये बांधलेला लाल किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जबरदस्तीने ताब्यात घेतला होता. कंपनीत त्याचे आजोबा, सासरे आणि शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांना हुमायूनच्या कबरीतून अटक करून रंगूनला पाठवण्यात आले.

वनवासात असताना 1872मध्ये जफरचा मृत्यू झाला. विस्मृतीत मृत्यू होऊन दीडशे वर्षे उलटली तरी सामान्य भारतीयांना जफरच्या कबरीची माहितीही नव्हती. बरीच शोधाशोध केल्यानंतर आणि पुरावे गोळा केल्यानंतर, त्याच्या मृत्यूच्या 130 वर्षांनंतर, सम्राट जफरला रंगूनमध्ये गुपचूप दफन करण्यात आले होते.

या लाल किल्ल्याचे बांधकाम मुघल शासक शाहजहानने 1648 ते 1658 दरम्यान यमुना नदीच्या अगदी काठावर पूर्ण केले होते. एकेकाळी यमुनेने वळसा घालून या किल्ल्याला तिन्ही बाजूंनी वेढा घातला. सहाव्या सम्राट औरंगजेबाने लाल किल्ल्यावर पांढऱ्या संगमरवरी एक छोटीशी सुंदर कलात्मक मोती-मशीद बांधली. पण 1857 मध्ये बहादूर शाह जफरला अटक करून इंग्रजांनी राजघराण्यासह किल्ला जबरदस्तीने कलकत्त्याला पाठवला. कंपनीने शाही खजिन्यासह लाल किल्ला लुटला आणि येथील बुर्जीवरील मुघल ध्वजाच्या जागी युनियन जॅक फडकवला. म्हणजे किल्ला ताब्यात घेतला.

देश स्वतंत्र झाला तेव्हा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला संदेश देत तिरंगा फडकवून नवी परंपरा सुरू केली. यानंतर अनेक दशके लाल किल्ल्यावर लष्करी प्रशिक्षणही दिले जात होते. 2007 मध्ये जागतिक वारसा यादीत त्याचा समावेश करण्यात आला.

First published:
top videos

    Tags: Delhi high court, Red fort delhi