• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Explained: दुसऱ्या लाटेत पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण? जाणून घ्या हे 10 मुद्दे

Explained: दुसऱ्या लाटेत पुन्हा होऊ शकते कोरोनाची लागण? जाणून घ्या हे 10 मुद्दे

एकदा कोरोना बरा झाल्यानंतर पुन्हा होऊ शकतो का?

 • Share this:
  ब्रिटनमधील केम्ब्रिजमध्ये झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलंय कि कोरोनाची लागण झालेल्या 1300 जणांपैकी 58 जणांना पुन्हा लागण झाली. एकदा कोरोना बरा झाल्यानंतर पुन्हा होऊ शकतो का? याबद्दल अनेक शंका आहेत. याबद्दल आयसीएमआर (ICMR) आणि जगातील इतर नामांकित संस्थांकडूनही अभ्यास केला गेला आहे. त्यामध्ये बऱ्याच फॅक्ट्स समोर आल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान संसर्गाचा धोका फार कमी होता. मात्र, या लाटेत मोठा धोका नाकारता येत नाही. एखाद्या व्यक्तीला दुसर्‍यांदा कोरोना संक्रमणाचा धोका किती आणि कशा प्रकारचा असतो? तसेच कोणासाठी हे जास्त धोकादायक आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. प्रश्नः रिइन्फेक्शनचा (Reinfection) धोका कोणाला आहे? उत्तरः ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, अशा लोकांमध्ये पुन्हा संक्रमण होण्याचा धोका आहे. म्हणजेच, या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती फार काळ टिकू शकत नाही किंवा त्यांचं शरीर रोगप्रतिकार शक्ती तयार करू शकत नाही. प्रश्नः पुन्हा संसर्ग होण्याच्या जोखमीवर काही अभ्यास झालाय का? उत्तरः इंटर्नल मेडिसीन (Internal Medicine) विषयातील तज्ज्ञ डॉ. स्वप्निल पारीख यांनी संयुक्तपणे एक पुस्तक लिहिलंय. हे पुस्तक कोरोना विषाणूबद्दलच्या अनेक तथ्यांवर आधारित आहे. या पुस्तकात पुन्हा कोरोना कोणाला होऊ शकतो याबद्दल माहिती आहे. याशिवाय, ‘द लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात म्हटलंय की 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना पुन्हा कोरोना होण्याचा धोका असतो. प्रश्नः पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता किती आहे? उत्तरः ज्येष्ठांसोबतच (Senior citizens) ज्यांना थॅलेसेमियासारखा आजार आहे, त्यांना धोका जास्त असतो. सुरुवातीला कोरोनाची पुन्हा लागण होणं दुर्मिळ आहे, असं मानलं गेलं. मात्र, अनेक अभ्यासांनंतर याची शक्यता १० टक्के आढळली आहे. हे ही वाचा-आता तुमच्या ऑफिसमध्येच तुम्हाला मिळणार कोरोना लस; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय प्रश्नः पुन्हा संक्रमण कसे होते? उत्तरः एकदा कोरोना संसर्ग झाल्यावर दुसऱ्यांदा जेव्हा विषाणू हल्ला करतो तेव्हा शरीर अँटीबॉडी (Antibodies) तयार करून विषाणुला कमजोर करतं. मात्र, विषाणूच्या दुसऱ्या हल्ल्यावेळी शरीरातील काही कमकुवत अँटीबॉडी प्रभावी ठरत नाहीत. ऑगस्ट 2020मध्ये कोरोना झालेल्या रुग्णाला परत इन्फेक्शन झाल्याची केस सापडली होती. प्रश्नः रिइन्फेक्शन ही किती गंभीर बाब आहे? उत्तरः एकीकडे भारतात लसीकरण चालूए. तर दुसरीकडे वाढत्या रुग्णसंख्येसह अनेक नवीन व्हेरियंट (New Variants) देशात सक्रिय असल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत, रिइन्फेक्शनच्या डेटानुसार बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा विषाणूची लागण होऊ शकते, असा धोका आहे. प्रश्नः पुन्हा लागण होणे जास्त धोकादायक (Dangerous) आहे का? उत्तरः रिइन्फेक्शन जास्त गंभीर असू शकतं का, याबाबत जगातील पहिल्या अभ्यासात सहभागी राहिलेले डॉ. पारीख यांच्या मते, बहुतेक प्रकरणांमध्ये ते गंभीर नसतं. पण काही लोकांमध्ये दुसरं इन्फेक्शन गंभीर होतं. हे विशेषतः अशा लोकांच्या बाबतीत झालंय ज्यांना पहिल्यांदा लक्षणं नव्हती. प्रश्नः या धोक्यामागे विज्ञान काय सांगतं? उत्तरः आयसीएमआरच्या अभ्यासानुसार असं मानलं गेलंय की, पहिल्या संसर्गाच्या तुलनेत दुसऱ्यांदा स्थिती अधिक गंभीर होते. जर पहिल्यांदा तुम्हाला कोरोनाची लागण झाली आणि तुम्हाला कोणतीही लक्षणं नसतील, तर तुमचं शरीर विषाणूविरुद्धच्या अँटीबॉडीजना लक्षात ठेऊ शकत नाही. त्यामुळेच विषाणूचा दुसरा हल्ला (Second Attack of Virus) होत असताना शरीर वेळीच ताकदीने त्याला रोखू शकत नाही. प्रश्नः लस किती फायदेशीर ठरते? उत्तरः लस संसर्ग रोखण्यात आणि रिइन्फेक्शची तीव्रता कमी करण्यास मदत करते. परंतु किती काळ? याबाबत कोणतीही निश्चित माहिती नाही. दुसरीकडे, फायझर आणि बायोएनटेक या कंपन्या दावा करतात, की ही लस घेतल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत संसर्ग होऊ शकत नाही. परंतु, मुद्दा असा आहे की लस घेतल्यानंतरही कोण किती काळ संसर्गापासून वाचू शकतं, हे त्याच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच ठरवू शकते. प्रश्नः नवीन व्हेरीयंटमुळे पुन्हा संक्रमण होण्याच्या जोखमीमध्ये काही फरक पडतो का? उत्तरः आपल्याला यूके व्हेरीयंट (B 1.1.7) आणि दक्षिण आफ्रिकन व्हेरीयंट (B.1.351) बद्दल तुम्हाला सांगितलंय की हे स्ट्रेन जास्त वेगाने पसरतात. डॉ. पारीख यांच्या म्हणण्यानुसार, जर व्हेरीयंटमध्ये अँटीजेनिक बदल झाल्यास पुन्हा संसर्ग होऊ शकतो. प्रश्नः रिइन्फेक्शन टाळण्यासाठी काही उपाय आहे का? उत्तरः कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून सांगण्यात आलेली खबरदारी घ्यावी. मास्क, स्वच्छता, सॅनिटायझेशन आणि सुरक्षित अंतराची सवय लावा. तुम्ही तरुण असाल, निरोगी असाल किंवा लस घेतली असेल, तरीही या सवयी तुम्हाला पुन्हा संसर्ग होण्याच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवतील.
  First published: