COVID-19: पोलिसांवर कोरोनाचं संकट, 24 तासांत 55 जवानांना बाधा; संख्या गेली 4,103वर

COVID-19: पोलिसांवर कोरोनाचं संकट, 24 तासांत 55 जवानांना बाधा; संख्या गेली 4,103वर

शनिवारी तब्बल 88 पोलिसांना कोरोनाने ग्रासलं होतं. तर आत्तापर्यंत 3000 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.

  • Share this:

मुंबई 21 जून : देशात कोरोना (Corona) बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 4.25 लाख पेक्षा जास्त जणांना कोरोनाने ग्रासलं आहे. तर 13,699 जणांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पोलिसांवर (Maharashtra Police) कोरोनाचं संकट अधिक गडद झालं आहे. गेल्या 24 तासांमध्ये आणखी 55 पोलिसांना कोरोनाने ग्रासलं आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 4,103 पोलिसांना कोरोनाने ग्रासलं आहे. शनिवारी तब्बल 88 पोलिसांना कोरोनाने ग्रासलं होतं. तर आत्तापर्यंत 3000 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाचे (COVID19) रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. आता पावसाळा लागल्याने सरकारची चिंता वाढली आहे. त्यासाठी महापालिकेने (BMC) एक Rapid Action Plan तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोनाचे रूग्ण वाढण्याची शक्यता असून त्यासाठी तयारी सुरू केल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांनी दिली आहे.

7 वॉर्डात रुग्णवाढीचा आकडा जास्त आहे त्यामुळे तिथे आता मिशन झिरो हा Rapid Action Plan  तयार केला आहे.

उच्चभ्रू वस्तीतील लोकांना आम्ही जबाबदारीने वागायला सांगितलं आहे. करण हाऊस हेल्पर आणि ड्रायव्हरही पॉझिटिव्ह निघाले आहेत. लोकांनी मास्क घालूनच बाहेर पडावं असं आवाहनही त्यांनी केलं.

कोरोनाचा धोका! झोपडपट्टी नाही तर आता बहुमजली इमारतींनी वाढवली चिंता

महापालिकेकडे पुरेसे बेड आहेत. भविष्यात कुणाला बेड्स मिळणार नाही असं होणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

धारावी वरळीनंतर आता मुंबईमध्ये सात वॉर्ड नवीन हॉटस्पॉट म्हणून आयडेंटिफाय करण्यात आलेत आणि या नवीन हॉट सपॉट मध्ये आता रॅपिड Action प्लॅन पूर्णपणे लागू केला जाणार आहे. म्हणजेच मिशन झिरो याअंतर्गत इथे नवीन रुग्ण निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे त्यासाठी 50 फिरते दवाखाने या वॉर्डमध्ये करोना रुग्णांची तपासणी करणार आहेत त्यांचे स्वाब टेस्टही केली इथे जाणार आहे.

तर देशात गेल्या 24 तासांत तब्बल 14 हजार 821 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या 4 लाख 25 हजार 282 झाली आहे.

देशात टॉप 5 खासदारांच्या यादीत सुप्रिया सुळे पहिल्या,कोल्हेंचीही धडाकेबाज एंट्री

सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 1 लाख 74 हजार 387 झाली आहे. तर, 2 लाख 37 हजार 196 रुग्ण निरोगी झाले आहे. मृतांची एकूण संख्या 13 हजार 699 झाली आहे. आनंददायी बातमी म्हणजे सर्वात जास्त लोकं निरोगी झाली आहेत. देशात आतापर्यंत 68 लाखांहून अधिक लोकांची चाचणी झाली असून आतापर्यंत 55.80% लोकं निरोगी झाली आहेत.वार

संपादन - अजय कौटिकवार

 

First published: June 22, 2020, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading