मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्लाझ्मा थेरेपीने केली कमाल; आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन कोरोनामुक्त

प्लाझ्मा थेरेपीने केली कमाल; आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन कोरोनामुक्त

आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन (Health Minister Satyendra Jain) यांची कोरोना टेस्ट आता नेगेटिव्ह आली आहे.

आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन (Health Minister Satyendra Jain) यांची कोरोना टेस्ट आता नेगेटिव्ह आली आहे.

आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन (Health Minister Satyendra Jain) यांची कोरोना टेस्ट आता नेगेटिव्ह आली आहे.

नवी दिल्ली, 22 जून : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन (Health Minister Satyendra Jain) यांनी कोरोनाविरोधातील लढा जिंकला आहे. प्लाझ्मा थेरेपीने (plasma therapy) त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ज्यानंतर काही दिवसांतच त्यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही दिला जाणार आहे.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना काही दिवसांपूर्वी ताप येत होता आणि श्वास घ्यायला त्रास होता होता. त्यांना राजीव गांधी सुपर स्‍पेशलियटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीत त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झालं असल्याचं समजलं.

यानंतर त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. सुरुवातीला चाचणी निगेटिव्ह आली पण रुग्णालयात केलेली दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर पुढील उपचारासाठी साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) त्यांना हलवलं. तिथे त्यांना कोविड-19 ( COVID-19)साठी प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. यानंतर त्यांच्या फुफ्फुसांमधील इन्फेक्शन कमी झालं आणि त्यांना ऑक्सिजन सपोर्टवरून काढण्यात आलं. एका दिवसातच ते आयसीयूमधून बाहेर आले होते. जनरल वॉर्डमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं होतं. आता त्यांची कोरोना टेस्टही नेगेटिव्ह आली आहे.

हे वाचा - Plasma Therapy चा कोरोना रुग्णांवर काय होतोय परिणाम? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

दरम्यान प्लाझ्मा थेरेपीमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यूचा दर 50 टक्के कमी झाला आहे. मात्र ही थेरेपी मॉडरेट रुग्ण म्हणजे मध्यम स्वरूपाची लक्षणं असलेल्या रुग्णांवरच परिणामकारक ठरत आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगद्वारे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

काय आहे प्लाझ्मा थेरपी?

डॉक्टरांनी सांगितलं की, जो रुग्ण 3 आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा घेतले जातात. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाझ्मा घेतलं जाऊ शकतो, तर कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा चढवलं जातं.

हे वाचा - रामदेव बाबांना मोठा झटका; निम्स म्हणालं, 'आम्ही CORONIL चं ट्रायल केलंच नाही'

दिल्लीतील एम्सचे रणदीप गुलेरिया म्हणाले, "कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. जेणेकरून त्या प्लाझ्मातील अँटिबॉडीद रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतील"

संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus in delhi, Health minister, Satyendra Jain