जाहिरात
मराठी बातम्या / देश / Delhi Fire : 100 पेक्षा जास्त जणांना रेस्क्यू, 26 जणांचे मृतदेह, दिल्लीत आग्नितांडवाने हाहा:कार

Delhi Fire : 100 पेक्षा जास्त जणांना रेस्क्यू, 26 जणांचे मृतदेह, दिल्लीत आग्नितांडवाने हाहा:कार

Delhi Fire : 100 पेक्षा जास्त जणांना रेस्क्यू, 26 जणांचे मृतदेह, दिल्लीत आग्नितांडवाने हाहा:कार

दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या एका कमर्शिअल इमारतीला आज संध्याकाळी साडेचार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत होरपळून आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 मे : देशाची राजधानी दिल्ली (Delhi Fire) आज आगीच्या घटनेने हादरली आहे. दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळ (Mundka Metro Station) असलेल्या एका कमर्शिअल इमारतीला आज संध्याकाळी साडेचार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. सुरुवातीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. त्यानंतर पाहता पाहता ही आग दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावर पोहोचली. आगीने प्रचंड रौद्र रुप धारणं केलं. आग जसजशी वाढत होती तसतसं तिने इमारतीतील अनेक नागरिकांना गिळंकृत केलं. आग प्रचंड वेगाने पसरल्याने तिथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे दुर्देवाने या आगीत आतापर्यंत तब्बल 26 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायकी बातमी आता समोर आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आता कुलिंगचं काम सुरु आहे. तसेच इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची घटना ही आज संध्याकाळी साडेचार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली. मुंडका परिसरात इमारतीत आग लागल्याची माहिती पोलिसांना सर्वात आधी मिळाली. एका पीसीआर कॉलच्या माध्यमातून पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच तातडीने स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर लगेच बचाव कार्य सुरु झालं. पोलिसांनी इमारतीच्या खिडक्या फोडून आतमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढलं आणि 12 जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. ( गोष्ट मान्सूनची, कधीही न वाचलेल्या प्रवासाची! ..तर उत्तर भारतातील मैदानी भागात पाऊस पडलाच नसता ) सबंधित तीन मजली इमारत ही कमर्शिअल इमारत आहे. तिथे वेगेवगळ्या खाजगी कंपन्यांचे कार्यालये आहेत. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर सर्वात आधी आग लागली. त्यानंतर ही आग वरच्या मजल्यांवर धुमसत गेली. ही आग नेमकी का लागली? याबाबतची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. पहिल्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि राऊटर उत्पादन करणाऱ्या कंपनीचं कार्यालय आहे. तिथूनच ही आग लागली, अशी माहिती आता तपासातून समोर आली आहे. अग्निशन दल, पोलीस यांनी मिळून संबंधित घटनेतून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जणांचा जीव वाचवला आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त जणांना रेस्क्यू करुन बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत प्रचंड मोठी जीवितहानी झाली. बचाव पथकाच्या जवानांच्या हाती आतापर्यंत 26 मृतदेह लागले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण दिल्ली हादरली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी आतापर्यंत अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तातडीने रुग्णवाहिकेची सुविधा करण्यात आलेली होती. प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत कार्य केलं जात आहे. दरम्यान, पोलिसांनी आगीच्या घटनेनंतर इमारतीच्या मालकाला ताब्यात घेतलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात